पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही, S Jaishankar यांनी स्पष्टच सांगितलं!

56
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही, S Jaishankar यांनी स्पष्टच सांगितलं!
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही, S Jaishankar यांनी स्पष्टच सांगितलं!

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar ) सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी १५ आणि १६ ऑक्टोबरला इस्लामाबादला जाणार असल्याची घोषणा परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी केली होती. यापूर्वी दिवंगत सुषमा स्वराज यांनी डिसेंबर २०१५मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. गेल्या वर्षी एससीओ परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनीही भारताचा दौरा केला होता. जयशंकर (S Jaishankar) यांच्या रूपाने तब्बल नऊ वर्षांनी भारताचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानला जाणार आहेत.

(हेही वाचा-Nitin Gadkari : आता विमानासारखा अनुभव घ्या बसमध्ये! नितीन गडकरी यांचं नवीन स्वप्न काय?)

जयशंकर (S Jaishankar ) यांनी आपण पाकिस्तान दौऱ्यामध्ये कोणाशीही द्विपक्षीय चर्चा करणार नाही असे शनिवारी स्पष्ट केले. दोन्ही देशांदरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दौऱ्यात ते पाकिस्तानच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र, आपण तेथे बहुपक्षीय परिषदेसाठी जात आहोत, द्विपक्षीय चर्चेसाठी नाही, असे जयशंकर यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले.

(हेही वाचा-Canada : परदेशात नोकरीसाठी जाताय तर थांबा! कॅनडात वेटरच्या नोकरीसाठी भारतीय तरुण आहेत रांगेत, व्हिडीओ व्हायरल)

“भारत-पाकिस्तान संबंधांच्या स्वरूपामुळे या दौऱ्यामध्ये माध्यमांना विशेष रस असेल. मी तेथे बहुपक्षीय परिषदेसाठी जात आहे. मी तेथे भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा करण्यासाठी जात नाही. मी एससीओचा सदस्य म्हणून जात आहे.” असं एस. जयशंकर यांनी सांगितलं. (S Jaishankar )

(हेही वाचा-SBI Fake Branch : या गावात स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून चोरांनी घातला लाखोंचा गंडा)

‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’च्या एका नेत्याने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना इस्लामाबादमध्ये निषेध आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जयशंकर १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये ‘एससीओ’ शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार मुहम्मद अली सैफ यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांना निषेध आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. (S Jaishankar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.