Bandra Kurla Complex : मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलाला नेमकी कधी सुरुवात झाली?

45
Bandra Kurla Complex : मुंबईतील वांद्रे - कुर्ला संकुलाला नेमकी कधी सुरुवात झाली?
Bandra Kurla Complex : मुंबईतील वांद्रे - कुर्ला संकुलाला नेमकी कधी सुरुवात झाली?
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण मुंबईतील फोर्ट, बॅलार्ड इस्टेट आणि नरिमन पॉइंट ही शहरातील मुख्य औद्योगिक केंद्र. जगभरातील सगळ्या महत्त्वाच्या बँका आणि इतर उद्योगांची मुख्य कार्यालय इथंच उभी राहिली आहेत. न्यूयॉर्कमध्ये जो दर्जा मॅनहॅटनला आहे, तोच भारतात आणि मुंबईत दक्षिण मुंबईला आहे. पण, त्यामुळेच इथं लोकांची गर्दी वाढत चालली होती. आहे ती जागा कार्यालयांना आणि लोकांनाही कमी पडत होती. इथं रोजच्या रोज लाखो लोक कामासाठी येत होते. ही गर्दी टाळण्यासाठी मग राज्यसरकारने प्रयत्न केला तो दक्षिण मुंबईच्या बाहेर अशी विविध औद्‌योगिक विकास केंद्र सुरू करण्याचा. हे काम मुंबई शहर विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएकडे सोपवण्यात आलं. (Bandra Kurla Complex)

(हेही वाचा- Nitin Gadkari : आता विमानासारखा अनुभव घ्या बसमध्ये! नितीन गडकरी यांचं नवीन स्वप्न काय?)

सर्व सुविधांनी युक्त कमर्शिअल रिअल इस्टेट केंद्र उभारण्याची महत्त्वाची जबाबदारी एमएमआरडीएला पार पाडायची होती. आणि त्यांनी पश्चिम उपनगरं आणि पूर्व उपनगरांना जोडणारा सायन, वांद्रे आणि कुर्ला भागातील एक पट्टा त्यासाठी निवडला. हेच ते वांद्रे – कुर्ला संकुल. (Bandra Kurla Complex)

१९७७ साली इथल्या पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या. तेव्हापासून नाबार्ड तसंच म्हाडाचं मुख्यालय, आयएल ॲंड एफएस मुख्यालय, एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, डाओ केमिकल्स, एनएससी कार्यालय, आयसीआयसीआय बँक, सिटी बँक, भारत डायमंड बोर्स अशी कैक महत्त्वाची कार्यालयं आहेत. एकूण ४ लाखांच्या वर लोक इथं रोज कामासाठी येतात. (Bandra Kurla Complex)

(हेही वाचा- Sachin Kurmi : रा.काँ.पार्टी तालुका अध्यक्षांच्या हत्येप्रकरणी तीन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात; आर्थिक वादातून केली हत्या)

वांद्रे – कुर्ला व्यापारी संकुल हे जवळ जवळ १,७४,५०० वर्ग मीटर जागेवर उभं राहिलं आहे. सध्या इथली ४२ टक्के जागा ही कार्यालयं म्हणजेच व्यापारी वापरासाठी होत आहे. तर १४ टक्के जागेवर निवासी संकुलं उभी राहिली आहेत. पश्चिम उपनगरी मार्गावर वांद्रे आणि पूर्व उपनगरी मार्गावर कुर्ला या स्थानकांपासून हे संकुल जवळ आहे. तर आगामी मेट्रो ३ प्रकल्पातील ४ स्थानकं याच परिसरात उभी राहणार आहेत. त्यामुळे इथं कामासाठी येणाऱ्या लोकांची चांगली सोय होणार आहे. (Bandra Kurla Complex)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.