NLC India Share : ‘या’ सरकारी धातू कंपनीचा शेअर आहे अजूनही किफायतशीर

NLC India Share : सध्या धातू कंपन्यांच्या शेअरना चांगली मागणी आहे 

144
NLC India Share : ‘या’ सरकारी धातू कंपनीचा शेअर आहे अजूनही किफायतशीर
NLC India Share : ‘या’ सरकारी धातू कंपनीचा शेअर आहे अजूनही किफायतशीर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय शेअर बाजारांमध्ये अलीकडे धातू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना चांगली मागणी आहे. पण, अशातच एक सरकारी धातू कंपनी एनसीएल ही अजूनही काहीशी दुर्लक्षित आहे. नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन असं या कंपनीचं नाव आहे. ही नवरत्न कंपनी कोळसा मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. नावाप्रमाणेच खाणकाम क्षेत्रातील ही कंपनी आहे. १९५६ साली कंपनीची स्थापना झाली असली तरी १९८६ मध्ये कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाली. (NLC India Share)

(हेही वाचा- Sachin Kurmi : रा.काँ.पार्टी तालुका अध्यक्षांच्या हत्येप्रकरणी तीन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात; आर्थिक वादातून केली हत्या)

कोळसा उत्खनन आणि ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात असलेल्या या कंपनीने आयपीओनंतर गुंतवणूदारांना तब्बल ३५० टक्क्यांचा परतावा आणि ३० टक्के लाभांश दिला आहे. आताही हा शेअर २७५.७५ अशा किफायतशीर भावात उपलब्ध आहे. (NLC India Share)

New Project 47

सध्या जगभरातील प्रमुख शेअर संशोधन संस्था या शेअरबद्दल आशावादी आहेत. त्यामुळे मागच्या आठवड्यात हा शेअर तब्बल ४ टक्क्यांनी चढला आहे. ऊर्जा क्षेत्रातील ही एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीच्या मालकीच्या ३ लिग्नाईट खाणी असून त्यातून दरवर्षी २८ दशलक्ष मेट्रिक टन इतकं लिग्नाईट उत्पादन होतं. राजस्थान आणि तामिळनाडू इथं कंपनीचे मुख्य प्रकल्प उभे आहेत. (NLC India Share)

(हेही वाचा- Nitin Gadkari : आता विमानासारखा अनुभव घ्या बसमध्ये! नितीन गडकरी यांचं नवीन स्वप्न काय?)

ऊर्जा निर्मितीत ही कंपनी अपारंपरिक स्त्रोतांवर भर देते. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये राजस्थानमधून ३३९० मेगावॅट इतकी वीज निर्मिती होते. तर तामिळनाडूमधून २५० मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती होते. याशिवाय १ गिगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती करणारी ही देशातील पहिली सौरऊर्जा कंपनी आहे. अंदमान निकोबार मधील प्रकल्पातून कंपनी पवन ऊर्जा निर्मितीही करते.  (NLC India Share)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.