Nandurbar : नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला आणि…

147
Nandurbar : नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला आणि...
Nandurbar : नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला आणि...

नंदुरबार (Nandurbar ) जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी, रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. या अपघातामुळे मेंढ्या पाळणाऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं असून एकच शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे कोंडाईबारी घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

(हेही वाचा-पंतप्रधान मोदींसमोर लाडकी बहीण योजनेवर बोलताना Asha Bhosle का झाल्या भावुक?)

धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांक ए पी 31 पी जी 0869 या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100हून अधिक मेंढ्यांना चिरडले. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. कोंडाईबारी घाटात वारंवार अपघात होत असतात. मात्र उपायोजना शून्य दिसून येत आहेत. तर या अपघताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे. (Nandurbar )

(हेही वाचा-‘युनेस्को’च्या पथकाची Pratapgad ला भेट; सेवेकऱ्यांचे केले भरभरून कौतुक)

या घटनेतील मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे) हे आपल्या शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात होते. दरम्यान, मागून येणारा एका भरधाव ट्रकने त्याच्या 100हून अधिक मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडल्या आहेत. हा ट्रक आंध्रप्रदेश राज्याकडून गुजरातकडे जात होता. ट्रकचालक रमेश दुगंला (राजू) या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. (Nandurbar )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.