राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी (०५ ऑक्टोबर) बारण येथील धन मंडी (Dhaanmandi) मैदानावर आयोजित स्वयंसेवक मेळाव्याच्या कार्यक्रमात 3,500 हून अधिक स्वयंसेवकांना संबोधित केले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी हिंदू समाजाला एक महत्वाचा संदेश दिला आहे. भारत एक महान राष्ट्र असून, जर सुरक्षित रहायचे असेल, तर भाषा, जात आणि प्रांत हे मतभेत आणि वाद नष्ट करून संघटित व्हावे लागेल, असे भागवत यांनी म्हटले आहे. (Mohan Bhagwat)
मोहन भागवत यांनी कार्यक्रमाला आलेल्या स्वयंसेवकांना संबोधित करताना भारत हे हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) असल्याचे सांगितले. तसेच ‘आम्ही येथे अनादी काळापासून राहत आहोत. हिंदू हा शब्द भारतात राहणाऱ्या सर्व पंथांसाठी वापरला गेला आहे. हिंदू (Hindu) प्रत्येकाला आपले मानतात आणि सर्वांना सामावून घेतात. (Mohan Bhagwat)
(हेही वाचा – Food Poisoning: सरकारी हॉस्टेलमधील जेवणात सरडा! १०० मुलींची प्रकृती खालावली)
भाषा आणि जातीय मतभेदांतून बाहेर पडावे लागले –
स्वयंसेवकांसोबत संवाद साधताना भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले, आपल्या सुरक्षिततेसाठी हिंदू समाजाला भाषा, जात आणि प्रांतासंर्भातील मतभेद आणि वाद सष्ट करून संघटित व्हावे लागेल. असा समाज निर्माण व्हायला हवा, ज्यात संगटन, सद्भावना आणि आत्मीयतेचा भाव असेल. याशिवाय, समाजात आचरणाची एक शिस्त असायला हवी, राज्याबद्दलचे कर्तव्य आणि टार्गेट ओरिएंटेड असणे आवश्यक आहे. समाज केवळ मी अथवा माझ्या कुटुंबाने तयार होत नाही. असेही भागवत म्हणाले. (Mohan Bhagwat)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community