Sexual Assault : भूतबाधा काढण्याच्या नावाखाली मौलवीने केला हिंदू महिलेवर अत्याचार

72
Sexual Assault : भूतबाधा काढण्याच्या नावाखाली मौलवीने केला हिंदू महिलेवर अत्याचार
Sexual Assault : भूतबाधा काढण्याच्या नावाखाली मौलवीने केला हिंदू महिलेवर अत्याचार

उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये बरेसर पोलिस ठाणे परिसरात मौलवी शान अहमदने महिलांसोबत धर्मांतर, अश्लील वर्तन (Sexual Assault ) आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बलिया नरही ठाण्यात पीडित महिलेने आरोपी मौलवीविरोधात तक्रार दाखल करताच संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पीडित महिलेचा आरोप आहे की, मौलवीने भूतबाधेपासून मुक्ती करण्याच्या बहाण्याने महिलेसोबत लैगिक अत्याचार (Sexual Assault) केला. तसेच तिला इस्लाम कबूल करण्यास जबरदस्ती केली.

धर्मांतर आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप

पीडितेचे म्हणणे आहे की, सासरकडचे कुटुंबीय मौलवी शान अहमदवर (Maulvi Shan Ahmed) विश्वास ठेवत. सासरच्यांनी मौलवीला घरी बोलवून आपल्या कुटुंबियांना समस्या असल्याचे सांगितले. तसेच आपल्या सुनेला भूतबाधा झाल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यानंतर पीडित महिलेला वारंवार मौलवीजवळ नेले जात होते. त्यावेळी मौलवीने (Maulvi Shan Ahmed) पीडित महिलेसोबत अश्लील वर्तन केले. तसेच भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने पीडितेवर लैगिक अत्याचार (Sexual Assault)केला. दरम्यान पीडितेला इस्लाम धर्म कबूल करण्यासाठी त्याने जबरदस्ती केली. त्यावेळी मौलवी हिंदू देवी-देवतांबद्दल अपशब्द काढल असे. मात्र ज्यावेळी पीडितेने यासर्व गोष्टी करण्यास नकार दिला तेव्हा मौलवीने तिला जीवेमारण्याची धमकी दिली.

( हेही वाचा : सरसंघचालक Mohan Bhagwat यांचं हिंदूंना मोठं आवाहन, म्हणाले भारत एक… 

पीडित महिलेने तक्रारीत सांगितल्याप्रमाणे, मौलवी शान अहमद (Maulvi Shan Ahmed) १०-१२ हिंदू तरुणी आणि महिलांना मुस्लिम धर्म स्विकारण्यास भाग पाडून सेवा करण्यास भाग पाडले. त्या महिलांना आर्थिक आणि मानसिकरित्या कमकुवत करून, मौलवी त्यांना इस्लामी कार्य करण्यास जबरदस्ती करत, असे ही पीडित महिलेने सांगितले. (Sexual Assault)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.