Maha Kumbh : महाकुंभात स्नान करण्यासाठी येणाऱ्यांची आधारकार्ड तपासा, सुरक्षेसाठी आखाड्याची मागणी

179
Maha Kumbh : राष्ट्रीय सुरक्षेसाठी महाकुंभात स्नान करण्यासाठी येण्याची आधारकार्ड तपासा, आखाड्याची मागणी
Maha Kumbh : राष्ट्रीय सुरक्षेसाठी महाकुंभात स्नान करण्यासाठी येण्याची आधारकार्ड तपासा, आखाड्याची मागणी

महाकुंभमध्ये (Maha Kumbh) सहभागी होणाऱ्या संतांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. जे देश-विदेशातून कुंभ स्नानासाठी भारतात येतात, त्यांनाही आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र आणावे लागणार आहे, असा निर्णय ८ आखाड्यांच्या संतांनी मिळून घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय आखाड्यांतील संतांकडून घेण्यात आला आहे.

( हेही वाचा : Bhopal Drug Case : भोपाळमध्ये NCB आणि ATS चा कारखान्यावर छापा ; १८०० कोटीचा ड्रग्स जप्त)  

प्रयागराजमधील दारागंज येथील निरंजनी आखाड्यांच्या मुख्यालयात आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी परिषदेचे महासचिव हरिगिरिजी महाराज यांच्‍यासह ८ आखाड्यांचे संत उपस्‍थित होते. या बैठकीत वाढता लव्ह जिहाद, गाईला राष्ट्रमाता घोषित करणे, कुंभमेळ्यात (Maha Kumbh) उर्दू आणि फारसी शब्द काढून सनातन संस्कृतीला साजेसे नाव ठेवण्यावर चर्चा झाली.

दरम्यान महाकुंभ (Maha Kumbh) परिसरात मांस, दारु यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची तसेच मठ- मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्ती झाली पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाड्यातील संतांनी आधारकार्ड तपासण्याची मागणी केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.