CM Ekanath Shinde यांचे उद्धव ठाकरेंना चॅलेज; म्हणाले मुलाशी काय… बापाशी…

134
CM Ekanath Shinde यांचे उद्धव ठाकरेंना चॅलेज; म्हणाले- मुलाशी काय...बापाशी...
CM Ekanath Shinde यांचे उद्धव ठाकरेंना चॅलेज; म्हणाले- मुलाशी काय...बापाशी...

उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उबाठा गटातील काही नेत्यांच्या पक्षप्रवेशादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेंचा ‘कार्ट’ म्हणून उल्लेख केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मुलाशी काय भिडता? बापाशी भिडा”, असं आव्हानच एकनाथ शिंदे(CM Ekanath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)दिले.

( हेही वाचा : Urdu Teachers Association : उर्दू शाळेत नव्या गणवेशाला विरोध, उर्दू शिक्षक संघटनेचा मनमानी कारभार

कल्याण- डोबिंवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती दिपेश म्हात्रे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह उबाठा गटात प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे ही पक्षप्रवेशाला उपस्थित होते. त्यावेळी ठाकरे म्हणाले की, आता मुख्यमंत्र्यांचं कार्ट खासदार झालायं. लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघांत पैसा ओतला. सत्तेचा गैरवापर करण्यात आला.मात्र, तरी देखील कल्याण-डोंबिवलीकरांनी जवळपास ४ लाख मते आपल्या भगव्याला मिळाली, असे विधान ठाकरेंनी केले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारला असता. शिंदे म्हणाले की, “मला त्यांच्या (उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे यांच्यावर) आरोपाला आरोप आणि उत्तर द्यायचं नाही. मी कामामधून उत्तर देतो. त्यामुळे ते बिथरलेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना धडकी भरल्यासारखी त्यांची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मी सांगतो बापाशी भिडा ना मुलाशी काय भिडताय”, असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde)यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.