Sachin Tendulkar : हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाचा, मराठी अभिजात भाषेच्या निर्णयावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

141

घटस्थापनेला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात (Marathi Abhijat Bhasha) भाषेचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली होती. दरम्यान दि. ६ ऑक्टोबर रोजी क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) याने प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : Hindu status : हिंदू धर्माबाबत स्टेटस ठेवले म्हणून अंकितला मारहाण; शाहिद, अयान, हसनैनने दिली जीवे मारण्याची धमकी

सचिनने (Sachin Tendulkar ) लिहले आहे की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा (Marathi Abhijat Bhasha) दर्जा मिळाल्याने त्यांच्यासारख्या अनेक मराठी मनांना अभिमान वाटतो आहे. हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाला दिलेली ओळख आहे. तसेच मराठी बरोबरच आसामी, पाली, बंगाली आणि प्राकृत या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने सचिनने (Sachin Tendulkar ) त्यांचेही अभिनंदन केले आहे. तसेच यामुळे जास्तीत जास्त लोकांनीही या सुंदर भाषेचे सौदर्य अनुभवता येईल, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) याने दिली आहे.

हेही पाहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.