मालाड येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांच्या हस्ते अनावरण

137
मालाड येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांच्या हस्ते अनावरण
मालाड येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांच्या हस्ते अनावरण

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक, हिंदुत्वाचे ध्वजवाहक, देशभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar Statue) यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी ०६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते संपन्न झाले. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना (Tejinder Singh Tiwana) यांच्या संकल्पनेतून मालाड पश्चिम येथील, पी उत्तर महानगरपालिका विभाग कार्यालया समोर, लिबर्टी गार्डन (Liberty Garden, Malad) येथे सावरकर चौकात पुतळा उभारण्यात आला आहे. (Piyush Goyal)

यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारतमातेचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी केलेले कार्य आणि अतुलनीय योगदान यावर प्रकाश टाकला. परदेशातूनही आपल्या लेखणीतून आणि मासिकांतून राष्ट्रवादाची ज्योत प्रज्वलित ठेवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले मराठी पत्रकार असल्याचे गोयल म्हणाले. सावरकरांचे देशाप्रतीचे समर्पण आपल्या देशाच्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. (Piyush Goyal)

(हेही वाचा – CM Ekanath Shinde यांचे उद्धव ठाकरेंना चॅलेज; म्हणाले मुलाशी काय… बापाशी…)

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) हे आपल्या युवकांचे आदर्श आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांचे त्याग, समर्पण, योगदान आणि बलिदान आपल्या भावी पिढ्यांनी स्मरणात ठेवण्यासारखे आहे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच त्यांच्या धारदार लेखणीने राष्ट्रवादाची विचारधारा त्या काळी देशवासियांच्या हृदयात रुजवली होती आणि आजही सावरकरांचे दूरदर्शी विचार, त्यांचा वारसा आणि विचार युवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. असे विधान तेजिंदर सिंग तिवाना यांनी केले. तसेच या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार गोपाळ शेट्टी, श्रीसिद्धीविनायक गणपती न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.