चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी परिसरात दि. ६ ऑक्टोबर रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दुर्घटनाग्रस्त परिसराला भेट देऊन या दुर्घटनेतून बचावलेल्या गुप्ता कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले.
(हेही वाचा : MP Chandrakant Handore यांना अटक करा, माजी खासदार राहुल शेवाळे यांची मागणी)
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना एकूण ३५ लाख रुपयांची शासकीय मदत देऊ केली आहे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिद्धार्थ कॉलनी परिसरात याआधी देखील अशा दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत मृत पावलेल्या रहिवाशांना देखील शासकीय मदत द्यावी आणि सिद्धार्थ नगरचा कायमस्वरूपी कायापालट होण्यासाठी इथल्या पुनर्विकास प्रक्रियेत राज्य शासनाने लक्ष द्यावे, अशी विनंती राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community