-
सचिन धानजी,मुंबई
आता प्रत्येकाच्या मनगटांवर लाखोंची घड्याळे बांधली जावून लागली असून काही सेलिब्रेटीज हे २५ ते ३० लाखांची घड्याळे वापरत असल्याचे आपण ऐकलंच असेल.पण घड्याळाच्या दुरुस्तीवर बारा लाखांचा खर्च हा तुम्ही ऐकलं नसेल. पण घडलंय मुंबई महापालिकेत. भायखळा राणीबागेत उभ्या असलेल्या क्लॉक टॉवरवरील घड्याळाच्या दुरुस्तीवर चक्क साडेबारा लाख रुपये खर्च केल्याची महितीच समोर आली आहे. (Ranibaug Clock Tower)
(हेही वाचा- BMC : ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ मुंबईत कुठे दिसलीच नाही!)
भायखळा वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या टॉवरवर लावण्यात आलेले घड्याळ बंद पडल्याने हे घड्याळ पुन्हा सुरु करण्यासाठी संचालक (प्राणिसंग्रहालय) यांनी निविदा मागवून दुरुस्तीसाठी कंपनीची निवड केली. या घड्याळाच्या दुरुस्तीकरता ११ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचा खर्च दर्शवला असून या कामांसाठी महापालिकेने नवरत्न इन्फ्रास्ट्रक्चरस कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे घड्याळाच्या दुरुस्तीवर बारा लाखांचा खर्च पाहून अनेकांचे डोळेच उघडेच पडले आहे. (Ranibaug Clock Tower)
राणीबाग हे पूर्वी व्हिक्टोरिया गार्डन या नावाने ओळखले जायचे. याठिकाणी सन १८६४ मध्ये घड्याळाचा हा टॉवर उभारण्यात आला होता, त्यामुळे हा टॉवर जवळपास १५० वर्षे जुना आहे. हा टॉवर पूर्वी डेव्हिड ससून क्लॉक टॉवर म्हणूनही ओळखला जात असे. ज्यावेळी हा टॉवर उभारला होता तेव्हा यावर ३० हजार रुपयांचा खर्च झाला होता.या टॉवरच्या बांधकामाची रचना ही इटालियन शैलीची आहे.यामध्ये पोरबंदर स्टोनचा वापर करण्यात आला आहे. (Ranibaug Clock Tower)
(हेही वाचा- Pakistan : कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन चिनी नागरिकांचा मृत्यू)
गिरणी कामगार हे पूर्वी ज्याप्रकार भोंग्यावरून कामावर जात असत किंवा वेळ जाणून घेत असत, त्याचप्रमाणे राणीबागेतील या घड्याळाच्या टॉवरवर पाहून पूर्वीच्या लोकांना किती वाजले याचीही माहिती होत असेल. पूर्वीच्या गिरणी कामगारांना या घड्याळावरून वेळेचे नियोजन करता येत असे. त्यामुळे ब्रिटीशांच्या काळात राजाबाई टॉवरसह मुंबईत अनेक ठिकाणी क्लॉक टॉवर उभारले गेले होते. ही वास्तू पुरातन असून या टॉवरवरील घड्याळाच्या दुरुस्तीसाठी एवढ्या मोठ्याप्रमाणात झालेला खर्च सर्वांच्या भुवया उंचावणाऱ्या ठरला आहे. (Ranibaug Clock Tower)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community