-
ऋजुता लुकतुके
२०२४ चं वर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच कियाच्या कार्निव्हल फेसलिफ्ट हायब्रीड मॉडेलची चर्चा सुरू झालेली होती. अखेर फेब्रुवारी महिन्यात कंपनीने ही कार अमेरिकेतील एका ऑटो-एक्स्पोमध्ये लाँच केली. कामगिरी आणि तंत्रज्जान या दोन्ही बाबतीत आधीच्या गाड्यांपेक्षा सरस असलेली कार्निव्हल कंपनीची फ्युचरिस्टिक कार म्हणून ओळखली जाते. कंपनीने सध्या कार्निव्हल एचईव्ही ही गाडी लोकांसमोर आणली आहे. (Kia Carnival)
(हेही वाचा- Ranibaug Clock Tower : घड्याळ दुरुस्तीवरच महापालिका खर्च करते १२ लाख रुपये)
या गाडीचं इंजिन आहे टर्बो १.६ लीटर पेट्रोल इंजिन. हायब्रीड असल्यामुळे या गाडीला ७२ बीएचपी क्षमतेची बॅटरीही असेल. ही दोन्ही इंजिन मिळून २४२ बीएचपी आणि ३६७ एनएम इतकी टॉर्क शक्ती ही गाडी निर्माण करू शकते. गाडीत ६ स्पीडचा ऑटो गिअरबॉक्सही आहे. ई-हँडलिंग, ई-ड्राईव्ह आणि ई-इव्हेझिव्ह हँडलिंग असिस्ट या यंत्रणांमुळे गाडी चालवण्याचा अनुभव आणखी समृद्ध करणारा झाला आहे. (Kia Carnival)
Take a closer look at the all-new Kia Carnival pic.twitter.com/6o8E2YKieo
— carandbike (@carandbike) October 3, 2024
किया कंपनीने भारतीय बाजारपेठेवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. यावर्षी कंपनीने कॉम्पॅक्ट एसयुव्ही श्रेणीतील किया सॉनेट बाजारात आणली होती. तिची सुरुवातीची किंमत ६३ लाख रुपये इतकी आहे. १.२ पेट्रोल इंजिन असलेली ही गाडी आहे. आता कंपनी कार्निव्हलही भारतात आणण्याचा विचार करत आहे. (Kia Carnival)
(हेही वाचा- सरपंच महिलेस पदावरून हटवल्याची Supreme Court कडून गंभीर दखल; म्हणाले…)
कार्निव्हल ही फ्युचरिस्टिक म्हणजे पुढील काळाचा विचार करून तयार केलेली गाडी आहे. यात गाडीने मार्गिका बदलल्यास, वेगाची मर्यादा ओलांडल्यास, आपत्कालीन परिस्थितीत ब्रेक दाबायचा झाल्यास चालकाला तशी सूचना देणं या सोयी आहेत. सध्या किया कंपनीच्या भारतात किया सॉनेट, किया सेल्टोस आणि किया कॅरन या एसयुव्ही गाड्या रस्त्यावर धावत आहेत. (Kia Carnival)