CIDCO च्या नवी मुंबईतील घरांची सोडत पुढे ढकलली; काय आहे कारण ?

96
CIDCO च्या नवी मुंबईतील घरांची सोडत पुढे ढकलली; काय आहे कारण ?
CIDCO च्या नवी मुंबईतील घरांची सोडत पुढे ढकलली; काय आहे कारण ?

सिडकोची नवी मुंबईतील (Navi Mumbai) रेल्वे स्थानकाबाहेरील घरांची सोडत आता 7 ऑक्टोबरला होणार आहे. आधीच्या नियोजनानुसार ती 2 ऑक्टोबरला निघणार होती. तारीख बदलली असली, तरी ७ ऑक्टोबरला तरी सोडत निघेल का, यात शंकाच आहे. सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सिडकोचे (CIDCO) अध्यक्ष संजय शिरसाट यांनी या घरांची सोडत 7 ऑक्टोबरला होईल, असे सांगितले होते. मात्र सोडतीमधील ऑनलाइन प्रक्रियेत घरांचा राखीव प्रवर्गाची वर्गवारी, त्याच बरोबर इतर काही तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना ही सोडत 8 ऑक्टोबर आधी घ्यावी, अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्या पूर्वी ही सोडत व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

(हेही वाचा – BMW M3 : बीएमडब्ल्यूची ‘हाय-परफॉर्मन्स स्पोर्टी’ कार भारतात दाखल होण्याच्या वाटेवर, कोलकात्यात शोरुम सुरू)

सिडकोच्या 26 हजार 667 घरांची सोडत निघणार आहे. ही सर्व घरे नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यातील अनेक घरे तर रेल्वे स्थानका शेजारीच आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या या घरांच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष आहे. नवी मुंबईतील खारघर, कामोठे, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वेस्थानकाजवळ ही घरे आहे. शिवाय घनसोली आणि तळोज्यातही सिडकोने घरे बांधली आहेत.

जवळपास 26 विविध ठिकाणी 43 हजार घरे बांधून तयार आहेत. याच घरांची सोडत सिडको मंडळाला काढायची आहे. ही घरे ज्या इमारतीत आहेत, त्या 11 ते 20 मजल्याच्या आहेत. आर्थिक दुर्बल उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये ही घरे मिळणार आहेत. सिडकोने (CIDCO) पहिल्यांदाच या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणातून ही सोडत काढली जाणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.