Prithviraj Chavan यांना निवडणूक जड जाणार ? सांगली पॅटर्न साताऱ्यातही राबवणार !

उबाठाच्या 'कॅप्टन'ने लावला 'मिशन विधानसभा' चा बॅनर

94
Prithviraj Chavan यांना निवडणूक जड जाणार ? सांगली पॅटर्न साताऱ्यातही राबवणार !
  • प्रतिनिधी

सातारा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी हा बालेकिल्ला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ढासळणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगू लागली आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वीच महाविकास आघाडीत फूट झाल्याचे दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठातील सातारा जिल्ह्याचे समन्वयक व कराडचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर (कॅप्टन) यांचे ‘मिशन विधानसभा’ असे फ्लेक्स कराड लावून विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे एकप्रकारे संकेत दिले आहेत. त्यामुळे सांगली पॅटर्न साताऱ्यातील दक्षिण कराड मतदारसंघात देखील राबवला जाणार आहे. त्यांनी फ्लेक्सआडून घेतलेल्या भूमिकेमुळे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची डोकेदुखी वाढवली आहे. अशात भाजपाकडून डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार तयारी केली असल्याने असल्याने पृथ्वीराज बाबांना ही निवडणूक जड जाणार हे नक्की!

(हेही वाचा – Assembly Election 2024 : ‘आयाराम-गयारामां’चा आठवडा)

कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत होणारी लढत ही प्रतिष्ठेची बनली असून, ‘बिग फाइट’मुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राजकीय खलबते देखील सुरू झाली आहेत. कराड दक्षिण मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण या ठिकाणी यावेळेस ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ रंगणार आहे.

(हेही वाचा – CIDCO च्या नवी मुंबईतील घरांची सोडत पुढे ढकलली; काय आहे कारण ?)

मागील विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेत तिरंगी झाली होती. यावेळेस उबाठाच्या माजी नगरसेवकाने लावलेल्या बॅनरबाजीमुळे तिरंगी होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्यातच लढत होणार असल्याचे सांगितले जात असले तरी या दोघांच्यात तिसरा (कॅप्टन) देखील आल्यास याचा फटका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नक्की बसू शकतो. कारण कराड शहर व तालुक्यातील उबाठाचे कार्यकर्ते यांची इंद्रजित गुजर यांच्या पाठीमागे ताकद आहे.

(हेही वाचा – Bombay High Court ने सांगितले बेकायदा झोपडपट्ट्या नियमित होण्यामागील राजकारण)

पृथ्वीराजबाबांना ही निवडणूक जड का जाणार ?

एकंदरीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोण ‘फाइट’ मारणार आणि कोण वातावरण ‘टाइट’ करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांनी सलग सात वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले. आता चव्हाण हे तिसऱ्यांदा सर्व ताकदीनिशी रिंगणात उतरताहेत. मात्र, पाच वर्षात केलेल्या कमी कामामुळे व पालिकेच्या नगरसेवकांनी सोडलेल्या साथीमुळे पृथ्वीराजबाबांना हि निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण मतदारसंघातील एकंदर परिस्थिती पाहता पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोनमध्ये असल्याचं बोललं जातंय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.