Paintings Exhibition : वांद्रे येथे भरणार प्रदीप म्हापसेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन

55
Paintings Exhibition : वांद्रे येथे भरणार प्रदीप म्हापसेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
Paintings Exhibition : वांद्रे येथे भरणार प्रदीप म्हापसेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन

ग्रंथाली – प्रतिभांगण यांच्या सौजन्याने ज्येष्ठ चित्रकार, कवी, साहित्यिक प्रदीप म्हापसेकर (Pradeep Mhapsekar) यांच्या चित्रांचे प्रदर्शन १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान भरणार आहे. शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ .०० वाजता ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक, राज्यसभेचे माजी खासदर कुमार केतकर यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. (Paintings Exhibition)

चित्ररसिकांसाठी पर्वणी

New Project 2024 10 07T154054.822

अमूर्त कला प्रकारातील ‘व्हाईट लीली’ नावाचे त्यांचे हे चित्रप्रदर्शन ग्रंथाली – प्रतिभांगण, केन रोड, सरकार हेरिटेजसमोर, बॅण्डस्टॅण्ड, वांद्रे पश्चिम येथे भरणार आहे. ‘मन्नतच्या बाजूला जन्नत’ अशा स्वरूपाचे हे चित्रप्रदर्शन असून चित्ररसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. (Paintings Exhibition)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.