मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहर आणि उपनगरात मेट्रोचे (Mumbai Metro) जाळे विस्तारण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आठ वर्षांपूर्वी मेट्रो ३ (Mumbai Metro) या भूमिगत मार्गिकेच्या कामाला प्रारंभ झाला. मुंबईकरांची या मेट्रोची प्रतीक्षा संपली आणि सोमवारपासून आरे ते बीकेसीपर्यंत पहिल्या टप्प्यात या भुयारी मार्गातून प्रवासाला सुरुवात झाली. बहुप्रतीक्षित अशी संपूर्ण भुयारी मेट्रो ३ मार्गिका अखेर मुंबईकरांना प्रवासासाठी खुली झाली आहे. सोमवारी ०३ ऑक्टोबर रोजी मेट्रो ३ची पहिली गाडी आरे येथून सकाळी ११ वाजता सुटली. मंगळवारपासून मात्र सकाळी ६.३० वाजल्यापासून ही मेट्रो सेवा सुरू होईल. (Mumbai Metro Line 03)
आरे ते बीकेसी (Aarey To BKC Metro) हा प्रवास रस्तेमार्गे बेस्ट बसने केल्यास साधारण १ ते दीड तास लागतो. शिवाय वाहतूक कोंडीतही अडकावे लागते. मुंबईबाहेरून येणारी वाहने आणि स्थानिक वाहने यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करणेही दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
(हेही वाचा – Prithviraj Chavan यांना निवडणूक जड जाणार ? सांगली पॅटर्न साताऱ्यातही राबवणार !)
मुंबईत ५९ किमी मेट्रोचे जाळे
मेट्रो ३ च्या (Mumbai Metro 3) पहिल्या टप्प्याच्या मार्गामुळे आता मुंबईकरांच्या सेवेत ५९ किमी अंतराचे मेट्रो जाळे दाखल झाले आहे. मुंबई महानगरात जवळपास ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, येत्या काही वर्षांत हे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकणार आहे. तसेच आरे ते बीकेसी हा प्रवास आता केवळ २२ मिनिटांत करता येणार आहे. (Mumbai Metro Line 03)
८ ऑक्टोबरपासूनचे मेट्रोचे वेळापत्रक
सोमवार ते शनिवार
– पहिली गाडी सकाळी ६:३०
– शेवटची गाडी रात्री १०:३०
रविवारी
– पहिली मेट्रो सकाळी ८:३०
– शेवटची गाडी रात्री १०:३०
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community