Conversion : धर्मांतर आणि निकाह करण्याच्या दबावाला कंटाळून हिंदू तरुणीने केली आत्महत्या, मोहम्मद कासिवला अटक

94
Conversion : धर्मांतर आणि निकाह करण्याच्या दबावाला कंटाळून हिंदू तरुणीने केली आत्महत्या, मोहम्मद कासिवला अटक
Conversion : धर्मांतर आणि निकाह करण्याच्या दबावाला कंटाळून हिंदू तरुणीने केली आत्महत्या, मोहम्मद कासिवला अटक

उत्तर प्रदेशाच्या संभल जिल्ह्यात एक हिंदू (Hindu) तरुणीने मुस्लिम तरुणाच्या निकाह आणि धर्मांतर (conversion) करण्याच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली आहे. मृत तरुणीचे नाव अनामिका असून तिच्यावर धर्मांतरांसाठी ही जबरदस्ती केली जात होती. याप्रकरणी दि. ६ ऑक्टोबर रोजीमोहम्मद कासिव (Mohammed Kasiv) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांना त्याला अटक केली आहे.

(हेही वाचा :  Attacks on Hindus : दुर्गापुजेची वर्गणी मागणाऱ्या हिंदूंवर कट्टरपंथींचा हल्ला, एकाचा मृत्यू

एका वृत्तसंस्थांने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना संभलच्या गुन्नौर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथील पीडित हिंदू (Hindu) तरुणीने दि. ६ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्त्या तरुणीच्या आईने सांगितले की ती आपल्या पती आणि मुलीसोबत संभल परिसरात राहत होती. मात्र परिसरातील मोहम्मद कासिव (Mohammed Kasiv) त्याच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. तसेच तो पीडितेवर इस्लाम कबूल (conversion) करण्यासाठी जबरदस्ती करत होता.

कासिवने दि. ३० सप्टेंबर रोजी कॉलेजवरून घरी जाणाऱ्या पीडित तरुणीला त्रास दिला. त्यानंतर वारंवार अशा घटना होत राहिल्याने दि. ५ ऑक्टोबर रोजी पीडित तरुणीने धर्मांतराच्या (conversion) दबावाला कंटाळून आत्महत्या केली. तिने राहत्या घरातील स्वतंत्र खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना तिचा देह पंख्याला लटकलेला आढळला. दरम्यान पोलिसांनी आरोपी मोहम्मदला (Mohammed Kasiv) अटक केली आहे.

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.