IPL Mega Auction : आयपीएलचा मेगा लिलाव सौदी अरेबियात होणार?

IPL Mega Auction : रियाध, जेद्दाह या शहरांची चर्चा सध्या सुरू आहे.

41
IPL Mega Auction : आयपीएलचा मेगा लिलाव सौदी अरेबियात होणार?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये यंदा खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तो होईल अशी शक्यता आहे. यंदा हा लिलाव सौदी अरेबियात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचं क्रिकबझ या वेबसाईटने म्हटलं आहे. यापूर्वी दुबईत झालेला लिलाव बीसीसीआय आणि सर्व संघांनाही महाग पडला होता. त्यामुळेच यंदा लंडन शहरात लिलाव आयोजित करण्याचा विचारही बीसीसीआयने मागे ठेवला. पण, आता पुन्हा एकदा परदेशातच लिलाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी रियाध आणि जेद्दाह शहरांची चर्चा सुरू आहे. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – Mayank Yadav : मयंक यादव पदार्पणात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा गोलंदाज)

खरंतर परदेशातील लिलाव महागात पडतो. पण, जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयला त्याची चिंता वाटत नाही. यापूर्वीही २०२४ च्या हंगामासाठीचा लिलाव दुबईत झाला होता. आताही लंडनचा पर्याय बीसीसीआने फक्त तिथल्या थंडीमुळे मागे टाकला आहे. सौदी अरेबियात तो घडवून आणण्यामागेही त्यांचा मोठा आर्थिक डाव आहे. सौदी अरेबियाने २०२० च्या दशकात विविध खेळांमध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे. इंग्लिश प्रिमिअर लीगच्या न्यूकॅसल क्लबमध्येही त्यांनी गुंतवणूक केली. ख्रिस्तियानो रोनाल्डोला खेळायला आपल्याकडे आणलं. (IPL Mega Auction)

(हेही वाचा – Conversion : धर्मांतर आणि निकाह करण्याच्या दबावाला कंटाळून हिंदू तरुणीने केली आत्महत्या, मोहम्मद कासिवला अटक)

आणि क्रिकेटमध्येही त्यांनी रस दाखवला आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी २०२२ पासून आयपीएलच्या एखाद्या क्लबमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी भारत भेटही दिली आहे. तसंच देशात क्रिकेटच्या पायाभूत सुविधा उभारण्याचाही त्यांचा विचार आहे. ते पाहता लिलावासाठी खर्च झाला तरी सौदी अरेबियाबरोबरचे क्रिकेटचे संबंध दृढ करण्याची संधी या निमित्ताने बीसीसीआयकडे चालून येणार आहे. (IPL Mega Auction)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.