Maha Kumbh 2025 च्या लोगोचे योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अनावरण; भाविकांना असा होणार फायदा

128
Maha Kumbh 2025 च्या लोगोचे योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अनावरण; भाविकांना असा होणार फायदा
Maha Kumbh 2025 च्या लोगोचे योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अनावरण; भाविकांना असा होणार फायदा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी ‘महाकुंभ मेळावा २०२५’ (Maha Kumbh 2025)च्या लोगोचे अनावरण केले. या मेळाव्याची माहिती देणारी वेबसाईट आणि अॅपदेखील योगींनी लाँच केले. तरी ‘महाकुंभ मेळावा २०२५’ (Maha Kumbh 2025) च्या लोगोमध्ये मेळाव्याचे प्रतिक म्हणून कलश दिसत आहे, ज्यामध्ये ओम लिहलेले आहे. तर मागील बाजूस संगमाचे दृश्य पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा : Paintings Exhibition : वांद्रे येथे भरणार प्रदीप म्हापसेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन

यावेळी योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) , केशव प्रसाद मौर्या आणि जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह (Dev Singh) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अधिकाऱ्यांसोबत महाकुंभ मेळाव्याच्या तयारीचा आढावा ही घेतला. तसेच वेबसाईटमुळे भाविकांना पर्यटकांना विमानसेवा, रेल्वेसेवा, रस्ते मार्गाने महाकुंभ मेळाव्यात पोहण्यासाठी मदत होईल, असा विश्वास योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी व्यक्त केला.

दरम्यान वेबसाईटवर स्थानिक वाहतूक, पार्किंग, निवासस्थान, घाटांपर्यंत पोहण्याचा मार्ग इत्यादीविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसओएस सुविधा, भाविकांसाठी स्मृती चिन्ह, धार्मिक वस्तु विकत घेण्याची सोय आधी सुविधाही देण्यात येणार आहेत. तसेच सर्व कार्यक्रमाची माहितीही अॅपच्या माध्यमातून भाविकांना मिळेल.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.