- ऋजुता लुकतुके
मुंबईने आपले शेवटचे आठ इराणी चषकाचे सामने गमावले होते. गत हंगामातील रणजी विजेता संघ आणि शेष भारत संघ यांच्यात इराणी चषकाची (Irani Cup 2024) अंतिम लढत पारंपरिक पद्धतीने होत असते. आणि रणजीचा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी ही लढत पार पडते. यंदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने ते करून दाखवलं जे गेल्या २७ वर्षांत मुंबईला जमलं नव्हतं. त्यामुळेच मुंबई क्रिकेट असोसिएशनने खुश होऊन संघाचं जाहीर कौतुक करण्याचं ठरवलं आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, विविध मैदान क्लब, तसंच मुंबईकर चाहते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ‘मुंबईकर क्रिकेटपटूंनी आपला ‘खडूस क्रिकेट’चा ब्रँड कायम ठेवत हे यश मिळवून दाखवलं आहे. कसोटीच्या पाचही दिवस मुंबईचंच वर्चस्व होतं. आणि २७ वर्षांनंतर इराणी चषक मुंबईकडे आला आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेटचं कौतुक करणं हे क्रमप्राप्त आहे,’ असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Irani Cup 2024)
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒! 🏆
Presenting the winners of #IraniCup 2024 👉 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢! 🏆 👍@IDFCFIRSTBank | @MumbaiCricAssoc pic.twitter.com/rbRhrth0iX
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 5, 2024
(हेही वाचा – महाराष्ट्रात कुणी विदुषकी चाळे करतो अन् बुजुर्ग म्हणावे तेच…; Raj Thackeray यांचा शरद पवारांना टोला)
लखनौच्या एकाना स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात पहिल्या डावापासूनच मुंबईने आपलं वर्चस्व दाखवून दिलं. सुरुवात ३ बाद ३७ अशी झाली असली तरी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सर्फराझ खानने डाव सावरला. अजिंक्यने ९७ तर सर्फराझने नाबाद २२२ धावा करताना मुंबईला ५०० धावांचा टप्पाही गाठून दिला. तनुष कोटियन हा अष्टपैलू फिरकीपटूही ६४ धावा करत मदतीला धावून आला. शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरनने १९१ धावा करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण, पहिल्या डावातील आघाडी तो संघाला मिळवून देऊ शकला नाही. तिथेच सामन्याचं चित्र स्पष्ट झालं. कारण, सामना अनिर्णित राहिला तर मुंबई विजयी ठरू शकणार होती. (Irani Cup 2024)
दुसऱ्या डावात मुंबईच्या नवव्या क्रमांकावरील तनुष कोटियनने शतक झळकावलं आणि शेष भारताची उरली सुरली आशाही धालवली. भारतीय संघातील डावखुरा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आता निवृत्तीकडे झुकला आहे. असं असताना अक्षर पटेलला आता तनुष कोटियनच्या रुपाने नक्कीच स्पर्धा निर्माण झाली आहे. (Irani Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community