Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट ; भाजपाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती तरीही उद्धव ठाकरे…

104
Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट ; भाजपाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती तरीही, उद्धव ठाकरे…
Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट ; भाजपाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती तरीही, उद्धव ठाकरे…

आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections 2024) जोरदार तयारी सुरू आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधक ही प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत.यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) असा सामना होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच शिनसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शिवसेना उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा गौप्यस्पोट केला.  (Sanjay Shirsat)

शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी २०१९ साली घडलेला प्रसंग सांगितला, शिरसाट यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) मुख्यमंत्री राहतील, अशी ऑफर भाजपाने (BJP) दिली होती. भाजपाने ऑफर देऊनही शिवसेना उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, असे संजय शिरसाट म्हणाले. या गौप्यस्पोटानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Sanjay Shirsat)

संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं ठरलं, त्यावेळी आम्ही सगळे मातोश्रीवर होतो. आम्ही डोळ्यासमोर पाहत होतो. २०१९ ला निकालात शिवसेना-भाजपा बहुमत आले होते. सर्वकाही ठरले होते, अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद यावरही भाजपाने पहिली अडीच वर्ष तुमची हे मान्य केले. परंतु कुणीतरी एक जण चर्चेला पाठवा. परंतु चर्चेला माणूस पाठवला नाही. तुला जायचं तर तू जा असं एकनाथ शिंदेंना म्हटलं. हे सर्व आधीच ठरले होते, भाजपासोबत जायचंच नाही मग इतका आटापिटा कशासाठी केला होता असा सवाल शिरसाटांनी उपस्थित केला. पदासाठीच हे सर्व केले, त्याला कारणीभूत संजय राऊत असा आरोपही शिरसाटांनी केला.   

(हेही वाचा – महाराष्ट्रात कुणी विदुषकी चाळे करतो अन् बुजुर्ग म्हणावे तेच…; Raj Thackeray यांचा शरद पवारांना टोला)

तुमच्याकडे लाचारांची फौज

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला चकरा मारत नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या स्वाभिमानाची फौज होती ती आता राहिली नाही. तुमच्याकडे लाचारांची फौज तयार झाली आहे. लाचारी करुन आपल्याला मिळेल ते घेणे एवढेच काम ठाकरे गटाचे आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.