Assembly Election : उरण मतदारसंघात शेकापकडून उमेदवारी जाहीर; उबाठाच्या अडचणीत वाढ

67
Assembly Election : उरण मतदारसंघात शेकापकडून उमेदवारी जाहीर; उबाठाच्या अडचणीत वाढ
  • प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन वाद सुरू झाला आहे. जागावाटप सुरु असतानाच मविआचे मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्षाने उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे.

(हेही वाचा – IPL Mega Auction : आयपीएलचा मेगा लिलाव सौदी अरेबियात होणार?)

उरण विधानसभा मतदारसंघातून पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्याने उबाठा शिवसेना गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे. उबाठाचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उरण विधानसभा मतदारसंघावर उबाठाने दावा केला आहे. उबाठाच्या दाव्यानंतर ही शेकपाने आपला उमेदवार घोषित केला आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Sanjay Shirsat यांचा गौप्यस्फोट ; भाजपाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती तरीही उद्धव ठाकरे…)

शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. म्हात्रेंकडून अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांना शेकाप पक्षात प्रवेश दिले आहेत. शेकापने उरण विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्याने मविआत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. मविआमध्ये अजूनही जागा वाटपाचे समीकरण ठरले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत मविआमध्ये जागावाटपाच निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.