- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी प्रदान केल्यानंतर तब्बल महिन्यांनंतर याबाबतच्या प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली आहे. त्यानुसार लवकरच याचे परिपत्रक जारी होणार असून आगामी नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पगारात वाढीव भत्ताची रक्कम जमा होणार आहे.मात्र,वाढीव भत्त्यांची रक्कम एप्रिल २०२४ पासून न देता सप्टेंबर २०२४ पासून ही भत्त्यांची वाढीव रक्कम कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पगाराच्या खात्यात जमा होणार आहे. (BMC 7’th Pay)
(हेही वाचा – MLA Vikas Thakre यांचा काँग्रेसला घरचा आहेर; म्हणाले ‘मविआ’ आणि ‘काँग्रेस’मध्येच छुपे गद्दार)
महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता, रजा प्रवास सहाय्य, तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते, मुलांच्या शिक्षणाकरीता भत्ता, दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. भत्ते वाढसंदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येईल असे मागील २९ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर केले होते. परंतु त्यानंतर एक महिना उलटला तरी याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने हिंदुस्थान पोस्टने ३० सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी संबंधित विभागाला निर्देश देत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजुरी घेतल्यानंतर स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव ठेवून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समितीने याला प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे याबाबत लवकरच याचे परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. (BMC 7’th Pay)
(हेही वाचा – नक्षलवादी तरुणांनी शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, Amit Shah यांचे आवाहन)
या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे याच्या अंमलबजावणीकरता सुमारे १७३ कोटी रुपयांचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एप्रिल २०२४ पासून केली जात असली तरी प्रत्यक्षात भत्ता वाढ सप्टेंबर २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पगारापासून थकीत भत्त्याची रक्कम पगारात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, एप्रिलपासूनची थकीत भत्याची रक्कम दिल जाणर नसून याची अंमलबजावणी सप्टेंबर २०२४ पासूनच केली जाईल आणि त्यानुसार भत्त्याची रक्कम खात्यात जमा केली जाईल,असे प्रशासनाने प्रस्तावात नमुद केल्याची माहिती मिळत आहे. (BMC 7’th Pay)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community