CC Road : रस्त्यांचे बांधकाम झाल्यानंतर करता येणार नाही खोदकाम!

323
Assembly Election : यापूर्वीच्या मतदानाचा अनुभव लक्षात घेऊन केंद्रांवर किमान सुविधा पुरवण्यावर भर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत रस्‍ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. रस्‍ते विकसित करतानाच उपयोगिता वाहिन्‍यांचीही कामे सुरू आहेत. त्‍यासाठी महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभाग, मलनिस्‍सारण विभागांसह वीज कंपन्‍या, इंटरनेट कंपन्‍या, दूरध्‍वनी कंपन्‍यांसमवेत समन्‍वय साधावा. एकदा रस्‍तेविकास झाला की, त्‍या रस्‍त्‍यावर खोदकाम, चर करायला परवानगी देऊ नये, अशाप्रकारचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (CC Road)

मुंबई महानगरपालिकेच्‍या २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) पावसाळ्यानंतर करावयाच्‍या विविध कामांचा महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवार ०७ ऑक्‍टोबर २०२४ रोजी आढावा घेतला. यामध्‍ये, पाणीपुरवठा, रस्‍ते विकास, पर्जन्‍य जलवाहिनी, पावसाळ्यात पाणी साचणारी ठिकाणे व त्‍यावरील उपाययोजना, नवीन स्‍वच्‍छतागृहांची बांधणी, ओला-सुका घनकचऱ्याचे संकलन, पावसाळाजन्‍य आजार, अनधिकृत फेरीवाल्‍यांवरील कारवाई, सशुल्‍क वाहनतळ, धोकादायक इमारतींवरील कारवाई, नागरी सुविधा केंद्रांची कामगिरी आणि नागरी तक्रारींचा निपटारा या प्रमुख विषयांचा समावेश होता. त्‍यावेळी महानगरपालिका आयुक्‍त गगराणी यांनी निर्देश दिले. (CC Road)

(हेही वाचा – BMC 7’th Pay : महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाढीव भत्त्यांची रक्कम मिळणार सप्टेंबर २०२४ पासूनच)

महानगरपालिका मुख्‍यालय इमारतीत झालेल्‍या या बैठकीस अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍यासह सहआयुक्‍त, परिमंडळ उप आयुक्‍त, २४ प्रभागांचे सहायक आयुक्‍त, विविध विभागांचे प्रमुख अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते. (CC Road)

महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, मुंबई महानगरात रस्‍ते काँक्रिटीकरणाची आणि सोबत उपयोगिता वाहिन्‍यांची देखील कामे सुरू आहेत. त्‍यासाठी महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभाग, मलनिस्‍सारण विभागांसह वीज कंपन्‍या, इंटरनेट कंपन्‍या, दूरध्‍वनी कंपन्‍यांसमवेत समन्‍वय साधला पाहिजे. एकदा रस्‍तेविकास झाला की, त्‍या रस्‍त्‍यावर खोदकाम, चर करायला परवानगी दिली जाणार नाही. कोणत्‍याही दबावाला न जुमानता रस्‍ते खोदकामास मंजुरी मिळणार नाही. रस्‍ते विभागातील अभियंत्‍यांनी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळावर उपस्थित राहून जागरूक राहिले पाहिजे, असे त्‍यांनी नमूद केले. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.