Mumbai Hawkers : अनधिकृत फेरीवाल्यांवर दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश

2898
Assembly Election : यापूर्वीच्या मतदानाचा अनुभव लक्षात घेऊन केंद्रांवर किमान सुविधा पुरवण्यावर भर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

अतिक्रमण निर्मूलन कारवाई करताना प्रभाग कार्यालयातील तसेच विविध खात्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने मोहीम राबवावी. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अनधिकृत फेरीवाले निर्मूलन कारवाई नियमितपणे केली जावी. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या कालावधीत तसेच शनिवार व रविवारीदेखील नियमितपणे कारवाई करावी, अशाप्रकारचे निर्देशच महापालिका आयुक्त तथा प्रशासक भुषण गगराणी यांनी दिले.

मुंबई महानगरपालिकेच्‍या २४ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) पावसाळ्यानंतर करावयाच्‍या विविध कामांचा महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवार ०७ ऑक्‍टोबर २०२४ रोजी आढावा घेतला. महानगरपालिका मुख्‍यालय इमारतीत झालेल्‍या या बैठकीस अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्‍त आयुक्‍त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍यासह सहआयुक्‍त, परिमंडळ उप आयुक्‍त, २४ प्रभागांचे सहायक आयुक्‍त, विविध विभागांचे प्रमुख अभियंता व संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Mumbai Hawkers)

(हेही वाचा – Car Parking : वाहनतळांच्या जागांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, आयुक्तांचे निर्देश)

बेवारस व भंगार वाहने हटविण्याची नियमाधीन कारवाई

माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यांवर कठोर करावी. रेल्‍वेस्‍थानके, पदपथ, उड्डाणपूल, वर्दळीची ठिकाणे फेरीवालेमुक्त करावीत. पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याच्‍या मोहिमेला वेग द्यावा, प्रसंगी पोलिसांची मदत घ्‍यावी. अतिक्रमण निर्मूलन कारवाई करताना प्रभाग कार्यालयातील तसेच विविध खात्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने मोहीम राबवावी. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अनधिकृत फेरीवाले निर्मूलन कारवाई नियमितपणे केली जावी. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या कालावधीत तसेच शनिवार व रविवारीदेखील नियमितपणे कारवाई करावी. वर्दळीच्‍या ठिकाणी कारवाईत सातत्‍य ठेवावे. महानगरपालिका हद्दीत आढळून येणारी बेवारस व भंगार वाहने हटविण्याची नियमाधीन कारवाई करावी, असेदेखील निर्देश आयुक्‍तांनी दिले आहेत. (Mumbai Hawkers)

New Project 68 1

(हेही वाचा – CC Road : रस्त्यांचे बांधकाम झाल्यानंतर करता येणार नाही खोदकाम!)

नागरिकांना विविध सेवा-सुविधा पुरविणे, हे महानगरपालिकेचे आद्यकर्तव्य!

महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, मुंबईकर नागरिकांना नागरी सुविधा केंद्रांमधून विविध सेवा-सुविधा पुरवल्या जातात. नागरिकांना विविध सेवा-सुविधा पुरविणे, हे महानगरपालिकेचे आद्यकर्तव्य आहे, त्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे. प्रत्‍येक विभाग कार्यालयात सुसज्‍ज नागरी सुविधा केंद्र आहेत. या ठिकाणी सामान्‍य मुंबईकर नागरिक विविध दाखल्‍यांसाठी-कागदपत्रांसाठी येत असतो.

कमी वेळेत, कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्‍ध

नाग‍री सुविधा केंद्रात नागरिकांसाठी पुरेशी आसन व्‍यवस्‍था, पिण्‍याचे पाणी, अडथळाविरहीत वावरता येईल अशी जागा इत्‍यादी उपलब्‍ध करून दिले पाहिजे. इंटरनेट, सर्व्‍हर, सिस्टिम सुरळीत सुरू राहिल, याची दक्षता घ्‍यावी. एकूणच, नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. कमी वेळेत, कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. (Mumbai Hawkers)

(हेही वाचा – BMC 7’th Pay : महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाढीव भत्त्यांची रक्कम मिळणार सप्टेंबर २०२४ पासूनच)

महिन्‍यातून दोनदा नागरी सुविधा केंद्राला भेट

नागरी सुविधा केंद्रातील कर्मचारी प्रशिक्षित, तंत्रस्‍नेही आणि सौजन्‍यशील आहेत, याची खातरजमा करावी. परिमंडळ उप आयुक्‍तांनी महिन्यातून एकदा आणि सहायक आयुक्‍तांनी महिन्‍यातून दोनदा नागरी सुविधा केंद्राला भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्‍यावा, नागरिकांशी संवाद साधून त्‍यांना भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करावे, असे निर्देशदेखील महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी या बैठकीत दिले. (Mumbai Hawkers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.