Air Pollution रोखण्यासाठी महापालिकेने बनवले धोरण; स्वयंपाकासाठी लाकूड जाळण्यास आणि शेकोटी करण्यास बंदी

658
Air Pollution रोखण्यासाठी महापालिकेने बनवले धोरण; स्वयंपाकासाठी लाकूड जाळण्यास आणि शेकोटी करण्यास बंदी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

वातावरणातील बदलांमुळे मुंबई क्षेत्रासह (मुंबई शहर आणि उपनगर) मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याने वायू प्रदूषण (Air Pollution) नियंत्रणासाठी महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बांधकामांशी संबंधित बाबींचाही समावेश आहे. आता महानगरपालिका प्रशासनाने त्याहीपुढे जाऊन वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या छोट्यामोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. बांधकामाच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी लाकूड व तत्सम बाबी इंधन म्हणून जाळणे तसेच शेकोटी पेटवणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, जेणेकरुन वायू प्रदूषण होणार नाही.

या मार्गदर्शक तत्वांचे आणि प्रमाणित कार्यपद्धतीचे बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व सरकारी तसेच खासगी संस्था, संघटना आदींनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

(हेही वाचा – Water : पाणीगळती रोखण्‍याबरोबरच अनधिकृत नळजोडण्‍यांवर कारवाई करा, आयुक्तांचे निर्देश)

मुंबईतील वायू प्रदूषण (Air Pollution) नियंत्रणासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित बैठकीत तपशीलवार चर्चा झाल्यानंतर गगराणी यांनी विविध सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सर्व परिमंडळ उप आयुक्त आणि सहायक आयुक्त या बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत सर्व संबंधित विभागांनी आपापल्या स्तरावरील धोरण, कार्यवाही यांची माहिती सादर केली. त्यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली. प्रमाणित कार्यपद्धतीच्या पुढे जाऊन अगदी लहानसहान घटकांवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, असे नमूद करुन महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सर्व संबंधितांना या बैठकीत आवश्यक ते निर्देश दिले.

(हेही वाचा – Mumbai Hawkers : अनधिकृत फेरीवाल्यांवर दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश)

मुंबई महानगरपालिकेकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी जारी मार्गदर्शक तत्त्वे

सर्व प्रकल्प प्रस्तावकांनी ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्रा/धातूचे आच्छादन उभारणे बंधनकारक असेल. एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंचीचे तर एका एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचे पत्रा/धातूचे आच्छादन लावावे. सर्व बांधकामाधीन इमारतींना सर्व बाजूंनी हिरवे कापड/ज्यूट/ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे बंधनकारक आहे.

अँटी स्मॉग गनचा वापर

कोणतेही बांधकाम पाडताना संबंधित ठिकाण हे वरपासून खालपर्यंत संपूर्णत: ताडपत्री/हिरवे कापड/ज्युट शीटने झाकलेले असावे. प्रत्यक्ष पाडकाम करतेवेळी सातत्याने पाणी शिंपडत राहावे किंवा फवारणी करत राहावी. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम साहित्य चढवताना (लोडिंग) आणि उतरवताना (अनलोडिंग) त्यावर पाण्याची फवारणी करत राहावे. (स्थिर/फिरत्या अँटी स्मॉग गनचा वापर करावा).

(हेही वाचा – Car Parking : वाहनतळांच्या जागांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर थेट कारवाई करा, आयुक्तांचे निर्देश)

साहित्यावर न चुकता पाण्याची फवारणी

बांधकामाच्या ठिकाणी धूळीचे कण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा राडारोडा/अन्य साहित्यावर सातत्याने आणि न चुकता पाण्याची फवारणी करावी. बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत (वरच्या बाजूने आणि सर्व बाजूंनीसुद्धा). जेणेकरून वाहतुकीदरम्यान बांधकाम साहित्य किंवा राडारोडा यांचे कण हवेत मिसळणार नाहीत. वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, जेणेकरुन वाहतुकीदरम्यान ते पडण्याचा धोका राहणार नाही. (Air Pollution)

सामानांची ने-आण करणाऱ्या वाहनांची चाके स्वच्छ करावी

सर्व बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. याद्वारे सामानांची ने-आण करणाऱ्या वाहनांची चाके स्वच्छ केली आहेत आणि वाहनांमध्ये वजन मर्यादा पाळून साहित्य नेल्याची खातरजमा करता येईल. सर्व बांधकाम प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण (Air Pollution) संनिरीक्षण प्रणाली तैनात करावीत आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण पातळी आढळून आल्यास त्वरित कृती करावी. ही संनिरीक्षण प्रणाली जेव्हा आणि जशी मागणी केली जाईल, त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पर्यवेक्षणासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल.

(हेही वाचा – CC Road : रस्त्यांचे बांधकाम झाल्यानंतर करता येणार नाही खोदकाम!)

धूळयूक्त हवेपासून बचाव करण्यासाठी

सर्व कामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगचे काम बंदिस्त भागात केले जावेत आणि त्यामुळे उडणाऱ्या धूळयूक्त हवेपासून बचाव करण्यासाठी काम करताना सातत्याने पाण्याची फवारणी करत राहावी. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी/परिसरात निर्माण होणारा बांधकाम आणि पाडकाम राडारोडा (डेब्रीज) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखड्यानुसार, निर्देशित केलेल्या ठिकाणीच नेला जावा. राडारोडा उतरवल्यानंतर, वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ केले पाहिजे.

सर्व वाहनांचे पीयूसी बंधनकारक

साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध पीयूसी (PUC) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि ते सक्षम अधिकाऱ्यांनी जेव्हा आणि जसे मागितल्यास सादर केले जावे. सर्व बांधकाम कर्मचारी/व्यवस्थापकांनी मास्क, गॉगल, हेल्मेट इत्यादी वैयक्तिक संरक्षक उपकरणे परिधान करणे अनिवार्य असेल.

(हेही वाचा – BMC 7’th Pay : महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाढीव भत्त्यांची रक्कम मिळणार सप्टेंबर २०२४ पासूनच)

पूल, मेट्रोच्या कमांमध्ये २५ फूट उंचीपर्यंत बॅरिकेडिंग

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या पूल आणि उड्डाणपुलासारख्या सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी २५ फूट उंचीची बॅरिकेडिंग केलेली असावी. मेट्रो रेल्वे प्रकल्पाची जमिनीच्या वर सुरू असलेली सर्व कामे २५ फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकली जावीत. बांधकामाची जागा ताडपत्री/हिरवे कापड/ज्युट शीटने झाकलेली असावी. बांधकामावेळी स्मॉग गन/वॉटर स्प्रिंकलरचा वापर करावा. (Air Pollution)

विशेष पथके तैनात

सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना एसआरए, म्हाडा, एमआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, बीपीटी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, रेल्वे, शासकीय किंवा निमशासकीय प्राधिकरणे तसेच खासगी बांधकाम प्रकल्पांना अनिवार्य आहेत. रात्री उशीरा अवैधपणे टाकला जाणारा राडारोडा रोखण्यासाठी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांनी विशेष पथके तैनात करावीत.

ट्रॅकिंग सिस्टम बसवलेली असावी

सर्व विभागांचे सहायक आयुक्त आणि इमारत बांधकाम प्रस्ताव विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वायू प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीचे नियमितपणे निरीक्षण करावे. सर्व बांधकाम व्यवसायिक/विकासकांनी ज्यांच्यामध्ये ट्रॅकिंग सिस्टम बसवलेली आहे, अशाच वाहनांचा कामांसाठी वापर करावा.

बांधकाम साहित्य झाकून ठेवावे

खुली/सुटी माती, वाळू, बांधकाम साहित्य आणि कोणत्याही प्रकारचा व कुठल्याही प्रमाणातील राडारोडा सीमांकित/समर्पित क्षेत्रामध्ये योग्यरित्या बॅरिकेड केलेल्या, पूर्णपणे झाकलेल्या/ बंद केलेल्या ठिकाणी ताडपत्रीच्या आच्छादनाखाली ठेवावे. सार्वजनिक रस्ते, पदपथ, पदमार्गिका आणि मोकळ्या जागेवर बांधकाम साहित्य आणि राडारोडा टाकला जाणार नाही, याची खात्री करावी. (Air Pollution)

(हेही वाचा – MLA Vikas Thakre यांचा काँग्रेसला घरचा आहेर; म्हणाले ‘मविआ’ आणि ‘काँग्रेस’मध्येच छुपे गद्दार)

प्रमुख रस्त्यांवरील धूळ रोज व्हॅक्यूम स्वीपिंग साफ करावी

प्रत्येक बांधकाम प्रकल्पास्थळी बाहेर पडण्याच्या ठिकाणी वाहनांची चाके धुण्याची सुविधा असावी. प्रमुख रस्त्यांवरील धूळ रोज व्हॅक्यूम स्वीपिंग किंवा पाण्याची फवारणी करून, घासून, झाडू मारून स्वच्छ करावी.

विकासकांनी कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करावी

बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांसाठी जेवण तयार करण्यासाठी लाकूड व तत्सम इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरात येत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा इंधनांमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरतो तसेच प्रसंगी सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता संबंधित विकासकांनी अशा ठिकाणी कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करावी. जेणेकरुन त्यांना जेवण बनवण्यासाठी इंधन म्हणून लाकडे व तत्सम बाबी जाळाव्या लागणार नाहीत आणि पर्यायाने धूरही होणार नाही. तसेच, संबंधित बांधकामाची ठिकाणे अधिक सुरक्षित राहतील. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.