Assembly Election Result 2024: Jammu & Kashmir, Haryana च्या जनतेचा कौल कोणाला? कोण मारणार बाजी?

164
Assembly Election Result 2024: Jammu & Kashmir, Haryana च्या जनतेचा कौल कोणाला? कोण मारणार बाजी?
Assembly Election Result 2024: Jammu & Kashmir, Haryana च्या जनतेचा कौल कोणाला? कोण मारणार बाजी?

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir, Haryana) विधानसभेसाठी (Assembly Election Result 2024) नुकतेच मतदान पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात मतदान झाले. आता हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक पार पडली असून ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली.

(हेही वाचा-Co-operative Societies : सहकारी संस्थांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत स्थगित)

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक (Assembly Election Result 2024) होत आहे. शिवाय, लोकसभेनंतरची ही पहिलीच निवडणुक असल्याने साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. (Jammu & Kashmir, Haryana)

(हेही वाचा-वैद्यकीय क्षेत्रातील ‘Nobel’ जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड)

श्रीनगर, हंदवाडा, कुपवाडा येथील मतमोजणी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी दावा केला आहे की, त्यांचा पक्ष राज्यात ३५ हून अधिक जागा जिंकेल. जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोळ यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मतमोजणी केंद्रांच्या सभागृहात केवळ उमेदवारांनी निश्चित केलेले एजंटच जाऊ शकतात. तसेच कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना परवानगी दिली जाईल. (Jammu & Kashmir, Haryana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.