मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे (Cyber Crime) शाखेकडून सायबर गुन्हेगारांची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे (Cyber Crime) शाखेने मागील ९ महिन्यात दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यातील ११४.३६ कोटी रुपये गोठविण्यात आले आहे. ही रक्कम १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर ‘गोल्डन अवर्स’ मध्ये आलेल्या तक्रारी नंतर गोठविण्यात आली आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे. मागील चोवीस तासात सायबर गुन्हे शाखेने १ कोटी रुपये गोठविण्यात आले आहे.
देशभरात वाढत्या सायबर गुन्हयावर (Cyber Crime) आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ‘१९३०’ हा सायबर हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर गोल्डन अवर्स मध्ये कॉल केल्यावर राज्यातील शहरातून ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली आहे. त्या संबंधित जिल्ह्यातील सायबर पोलिसांकडून तात्काळ त्याची दखल घेऊन ज्या खात्यावर ऑनलाईन रक्कम गेली, ते खाते गोठविण्यात येते. मुंबई सायबर गुन्हे शाखेने मागील २४ तासात ३ गुन्ह्यातील बँक खाते गोठवून १ कोटी १ लाख रुपये वाचवले आहे.
(हेही वाचा – Assembly Election Result 2024: Jammu & Kashmir, Haryana च्या जनतेचा कौल कोणाला? कोण मारणार बाजी?)
या प्रकारे सायबर पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर २०२४ या नऊ महिन्यात १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारी नंतर फसवणूक झालेल्या पीडित व्यक्तीने ज्या बँक खात्यावर पैसे पाठवले ते खाते गोठवून ११४ कोटी ६० लाख रुपये वाचवले आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तक्रारदार यांच्या खात्यावर ही रक्कम वळविण्यात येणार आहे. बहुतेक गुन्ह्यात डिजिटल अटक घोटाळ्यात फसवले गेलेल्या पीडितांचा समावेश आहे. सायबर गुन्ह्यात आर्थिक फसवणूक झालेल्या पीडितांनी तात्काळ १९३० वर कळवावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर यांनी केले आहे. “हेल्पलाइन टीम चोवीस तास काम करते. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर ४६ हजार तक्रारी झालेल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
१९३० हेल्पलाइन – संपर्काचे केंद्रीकृत बिंदू
१९३०’ हेल्पलाइन हे गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील एक आवश्यक उपक्रम आहे, ज्याची रचना पीडितांना तक्रार करण्यास आणि सायबर गुन्ह्यांसाठी (Cyber Crime) मदत मिळविण्यासाठी करण्यात आली आहे. ऑनलाइन फसवणूक, सायबर धमकी, ऑनलाइन छळ, आर्थिक घोटाळे आणि इतर इंटरनेट-संबंधित गुन्हेगारी क्रियाकलापांना बळी पडलेल्या व्यक्तींसाठी हे संपर्काचे केंद्रबिंदू म्हणून काम करते. हेल्पलाइनचे प्राथमिक उद्दिष्ट वेळेवर समर्थन देणे आणि सायबर गुन्हेगारांविरुद्ध आवश्यक कारवाई करणे हे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community