दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशविघातक कृत्य केले म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता, असे खळबळजनक विधान ‘एमआयएम’चे माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केले.
शिवसेना उबाठा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एमआयएम पक्ष देशविघातक कृत्य करणारी पार्टी असल्याने आम्हाला त्यांना सोबत घ्यायचे नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देतांना जलील यांनी न्यूज चॅनलशी बोलताना दानवे यांनाच आव्हान दिले की, “दानवे यांनी स्पष्ट करावे की कुठल्या प्रकारचे देशविघातक कृत्य आम्ही केले आहे. देशविघातक कृत्य दानवे यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार निवडणूक आयोगाने सहा वर्षासाठी काढून घेतला होता. आणि देशामध्ये असे खूप कमी लोक आहेत ज्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.”
(हेही वाचा – NMC : नाशिक मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस )
.. तर आम्हाला अटक करा,
“जर आम्ही देशविघातक कृत्य केले असेल तर, राज्यात अंबादास दानवे यांच्या पक्षाची भाजपासोबत सत्ता होती तेव्हा आमच्यावर कारवाई का केली नाही? आम्ही जर देशविघातक कृत्य करीत आहोत हा गंभीर आरोप आहे. एसी ऑफिसमध्ये बसून बडबड करण्यापेक्षा वेळ न घालवता, आजच्या आज तुम्ही चालत क्रांतीचौक पोलीस स्टेशनला जाऊ शकता. तिकडे जा आणि पुरावे सादर करा आणि आम्हाला अटक करा,” असे आव्हान जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केले आहे.
आम्हीही बघून घेऊ
लोकसभा निवडणूकीत शिवसेना उबाठाला मुस्लिम मते मिळाली याकडे जलील यांनी लक्ष वेधले. “त्यांचा आमच्या मतदानावर डोळा आहे. त्यांना हे (मुस्लिम समाजाचे) मतदान तर हवे पण नेता नको. लोकसभेला तुम्ही मते तर घेतली आणि असे वाटत असेल की तीच परिस्थिति विधानसभेलाही राहील, तर आम्ही पण बघून घेऊ की कुणाला किती मते मिळतात?” असा गर्भित इशाराही जलील यांनी शिवसेना उबाठाला दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community