नवरात्रीचा उत्सव शक्तीच्या नऊ रूपांना समर्पित आहे. अश्विन महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. या नऊ दिवसांत देवीने वेगवेगळी रूपे घेऊन असुरांचा वध करून जगाचे रक्षण केले, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी वेगवेगळ्या दिवशी देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मोठ्या संख्येने गरबा दांडिया उत्सवामध्ये लोक सहभागी होतात. पण दांडिया खेळताना पुण्याच्या चाकणमध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. (Pune News)
अतिशय दुःखद घटना
गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे कलाकार अशोक माळी यांचा गरबा खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्याजवळील चाकण मध्ये दुर्दैवी अंत….😢
भावपूर्ण श्रद्धांजली🙏#पुणे #Pune pic.twitter.com/t6Gj9bHOQR— 𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁 (@hypernationalst) October 7, 2024
चाकणमध्ये अशोक माळी (Ashok Mali) हे दांडिया खेळत होते. त्यांच्या आजूबाजूला लहान मुलही दांडिया खेळत होते. त्याच वेळी त्यांना भोवळ आली. ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळातच त्याचा मृत्यू ही झाला. हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुण्याच्या चाकण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत अशोक माळी (Ashok Mali) या गरबा डान्सरचा हार्ट अटॅक येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Pune News)
या आधीही अशीच घटना घडली होती. दरम्यान हा घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यात अशोक माळी हे दांडिया खेळत असताना दिसत आहे. ज्या सहजतेने ते दांडिया खेळत आहेत हे पाहिले असता पुढे असं काही भयंकर होईल याची कल्पनाच कोणी केलेली नसेल. पण नाचता नाचता अचानक ते खाली कोसळतात आणि तेथेच बेशुद्ध होतात. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आलं. (Pune News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community