BMC : गळती दुरुस्तीच्या कामात कंत्राटदारांचे संगनमत; माजी विरोधी पक्ष नेत्यांनी केली चौकशीची मागणी

742
BMC : गळती दुरुस्तीच्या कामात कंत्राटदारांचे संगनमत; माजी विरोधी पक्ष नेत्यांनी केली चौकशीची मागणी
BMC : गळती दुरुस्तीच्या कामात कंत्राटदारांचे संगनमत; माजी विरोधी पक्ष नेत्यांनी केली चौकशीची मागणी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या (BMC) जलअभियंता विभागाच्यावतीने जलवाहिन्यांच्या गळती (Leakage of water pipes) दुरुस्तीकरता निमंत्रित केलेल्या निविदेत पूर्व उपनगरांतील कामांमध्ये कंत्राटदारांनी संगनमत करून काम मिळवण्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Former Opposition leader Ravi Raja) यांनी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी (BMC Commissioner Dr. Bhushan Gagrani) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या निविदा कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राजा यांनी या निवेदनाद्वारे केली आहे आहे. (BMC)

मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी गळती दुरुस्तीच्या कामांकरता निविदा मागवण्यात करण्यात आली होती. यात शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील प्रत्येक प्रशासकीय विभागांकरता स्वतंत्र कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या यातील पूर्व उपनगरातील दोन वार्डात कंत्राटदार कंपन्याने संगनमत ककरून काम मिळवले असल्याचा आरोप राजा यांनी करताना वॉर्डातील दाखले दिले आहेत. रवी राजा यांच्या तक्रारीत,महापालिकेच्या एल विभाग आणि एन विभागांमध्ये लघुत्तम ठरलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील कंपन्यांनी समसमान बोली लावत काम मिळवले असल्याचे म्हटले आहे. एल विभागात पात्र ठरलेली स्वस्तिक कंस्ट्रक्शन या कंपनीने (-६.३० टक्के) बोली लावत काम मिळवले. तर याच निविदेत पॉप्युलर इंटरप्रायझेस या कंपनीने (-३.६०) व डि बी इन्फ्राटेक या कंपनीने (०.००० टक्के) बोली लावली. या ठिकाणी तीन निविदाकरांनी सहभाग नोंदवला होता.

तर महापालिकेच्या एन विभागात पाच निविदाकरांनी निविदा खरेदी केल्या होत्या, आणि त्यातील तीन निविदाकरांनी निविदा भरल्या. त्यात स्वस्तिक कंस्ट्रक्शन कंपनी ही पात्र ठरली. त्यात त्यांनी (-६.३०० टक्के) बोली लावली. तर याच निविदेत सी ई इन्फ्रा कंपनी (-३.६०टक्के) व डि बी इन्फ्राटेक या कंपनीने (०.००० टक्के) बोली लावली.

(हेही वाचा – Kalyan Crime : भीक मागण्यासाठी मुलाची चोरी करणाऱ्या टोळ्या शहरात कार्यरत ) 

या दोन्ही कामांमध्ये पात्र ठरलेली स्वस्तिक आणि त्यात भाग घेतलेल्या डि बी इन्फ्राटेक कंपनीचे दर समसमान आले असून, एल विभागात सहभागी होणाऱ्या पॉप्युलर कंपनीच्यावतीने एन विभागात निविदा खरेदी करूनही त्यांनी भाग घेतला नाही. यातून स्वस्तिक आणि डि बी इन्फ्राटेक कंपनीमध्ये संगनमत झाल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचे राजा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

एवढेच नाहीतर पूर्व उपनगरांतील एस विभागातील कामांमध्ये हीच स्वस्तिक कंस्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली. तिथे या कंपनीने (-२२.१०० टक्के) बोली लावली. तर याच निविदेत डि बी इन्फ्राटेक (-७.२०० टक्के) एवढा दर आकारला, हिरेन अँड कंपनी (- १५.११० टक्के), रिध्दी एंटरप्रायझेस (- १४.४०० टक्के) एवढी बोली लावली. मग स्वस्तिक कंस्ट्रक्शन कंपनी दोन कामांमध्ये समान (-६.३०० टक्के) एवढा दर आकारत असताना एस विभागांतील कामांमध्ये -२२.१०० टक्के बोली लावून काम मिळवल्याने एल आणि एन या कामांतही शंकेस वाव मिळत आहे. त्यामुळे या निविदेतील कंत्राट कंपन्यांनी संगनमत करून ही कामे मिळवल्याचे स्पष्ट होत असल्याने पूर्व उपनगरांमधील एल आणि एन कामांची आपल्या स्तरावर चौकशी करण्यात यावी. आणि संगनमत झाल्याचे दिसून आल्यास सदर निविदा रद्द करण्यात यावी तसेच चौकशी होईपर्यंत या कामांना मंजुरी तथा कार्यादेश देण्यात येवू नये. किंवा त्यांना एस विभागातील दरात काम करण्यास भाग पाडावे. जेणेकरून महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही.

(हेही वाचा – Mumbai Mhada lottery : म्हाडाच्या २०३० घरांसाठी मंगळवारी सोडत; कोण ठरणार भाग्यवान ? जाणून घ्या एक क्लिकवर   )

दरम्यान, याबाबत जल अभियंता पुरुषोत्तम महाराज (Engineer Purushottam Maharaj) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची निविदा अंतिम झालेली नसून याबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरावर निविदाकारांशी वाटाघाटी सुरू आहेत. यामध्ये अजून किती दर कमी करण्यास तयार आहेत, यावर निर्णय घेतला जाईल आणि शेवटी यापेक्षा कमी दरात काम करण्यास तयार नसतील. तर मग आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीने निविदा रद्द करण्याच्या निर्णय घेतल्या जाऊ शकतो,असे ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.