-
ऋजुता लुकतुके
बीवायडी इंडिया आता भारतात आपली नवीन गाडी इमॅक्स ७ लाँच करण्याच्या तयारीत आहे. आधीच्या ई६ गाडीचं हे फेसलिफ्ट व्हर्जन असलं तरी नवीन गाडी जास्त आधुनिक आणि अधिकचे फिचर असलेली आहे. गाडीची किंमत ३२ लाखांपासून सुरू होतेय. सध्या भारतात गाडीचं बुकिंग सुरू झालंय. आणि तुम्ही ५१,००० रुपये भरून गाडी बुक करू शकता. बीवायडी इमॅक्स ७ (BYD eMAX 7) ही फेसलिफ्ट असली तरी ई६ च्या तुलनेत गाडीत अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत.
मूळात गाडीचा बाहेरून दिसणारा लुक खूपच वेगळा आहे. गाडीचा अख्खा बंपर बदलण्यात आला आहे. एलसीडी दिव्यांच्या ऐवजी आता एलईडी दिवे आले आहेत. गाडीच्या आतल्या भागात तर मोठे बदल झाले आहेत. डॅशबोर्डवर आता १२.८ इंचांचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. मोबाईल फोनसाठी वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे. मोठं पॅनोरमिक रुफ आहे. आणि चालकाला मदत करण्यासाठी यात ३६० अंशांचा कॅमेराही आहे. (BYD eMAX 7)
(हेही वाचा – Assembly Elections 2024 : विदर्भातील जागा वाटपाचा तिढा सुटेना, मविआच्या बैठकीत निर्णय नाही)
BYD India Opens Bookings for BYD eMAX 7, Launching October 2024 https://t.co/VLUbQ8Phnr pic.twitter.com/4MrY7n5sAv
— Motoroids (@Motoroids_India) September 20, 2024
ही एमपीव्ही गाडी सहा सीटर आणि ८ सीटर अशा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. मागच्या दोन रांगांमध्येही एसी व्हेंट, कप होल्डर, सीट बेल्ट आणि आधुनिक हेडरेस्ट आहेत. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कार आहे. त्यामुळे यातील बॅटरी पॅक अर्थातच महत्त्वाचा आहे. सुरुवातीला गाडीचं बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना यात सवलत मिळणार आहे. पहिल्या १००० ग्राहकांना ७ केडब्ल्यू किंवा ३ केडब्ल्यू क्षमतेचा चार्जर मिळणार आहे. पण, ८ ऑक्टोबरपर्यंत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनाच ही सवलत मिळेल. २५ मे २०२५ पर्यंत गाडीची डिलिव्हरी सुरू होईल. गाडीची नेमकी किंमत डिलिव्हरी सुरू झाल्यापासूनच कळेल. पण, सध्या ती ३२,००,००० रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. (BYD eMAX 7)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community