Mayank Yadav : मयंक यादव आता आयपीएल लिलावात ‘मिलियन डॉलर मॅन’

मयंक यादवला कायम राखण्यासाठी लखनौ संघाला ११ कोटी रुपये मोजावे लागू शकतात.

144
Mayank Yadav : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही मयंक यादव संघात का नाही?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा उगवता स्टार तेज गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताकडून टी-२० पदार्पण केल्यानंतर त्याचं आयपीएल मूल्य रातोरात वाढलं आहे. यापूर्वी तो अननुभवी म्हणजेच अनकॅप्ड खेळाडू होता. त्यामुळे त्याला कायम ठेवण्यासाठी लखनौ संघाला फक्त ४ कोटी रुपये मोजावे लागले असते. पण, लिलावापूर्वी त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय सामन्याचा टिळा लागल्यामुळे आता त्याची किंमतही वाढली आहे. आता लखनौ फ्रँचाईजीला मयंकला कायम ठेवायचं असेल तर ११ कोटी रुपये मोजावे लागतील.

(हेही वाचा – Dipa Karmakar : भारताची पहिली ऑलिम्पिक जिमनॅस्ट दीपा कर्माकरची अचानक निवृत्ती)

नितिश कुमार रेड्डीसाठीही (Nitish Kumar Reddy) सनरायझर्स हैद्राबादला तेवढीच किंमत मोजावी लागू शकते. ही किमान किंमत आहे. एरवी अनुभवी खेळाडूला कायम ठेवण्यासाठी संघांना अनुक्रमे १८ आणि १४ कोटी रुपये मोजायचे आहेत. आयपीएलच्या ताज्या नियमांनुसार, लिलावापूर्वी खेळाडूची आंतरराष्ट्रीय संघात वर्णी लागली तर तो खेळाडू अनुभवी मानण्यात येईल. आणि असे ५ खेळाडू राखून ठेवण्याचा जो अधिकार संघांना देण्यात आले आहेत, त्याच श्रेणीत आता या खेळाडूंना स्थान मिळेल. सहावा खेळाडू जो संघांना राखता येईल, तो अननुभवी खेळाडू असेल. त्यासाठी मोजायची किंमत ४ कोटी रुपये इतकी आहे.

(हेही वाचा – Haryana Election Result 2024 : हरियाणातील महत्त्वाच्या मतदारसंघात काय स्थिती? जाणुन घ्या कोण आघाडीवर?)

३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व फ्रँचाईजींना ते राखून ठेवणार असलेल्या खेळाडूंची यादी आयपीएल प्रशासनाला कळवायची आहे. लखनौ फ्रँचाईजी के एल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉईनिस यांच्याबरोबरीने मयंक यादवलाही (Mayank Yadav) कायम ठेवेल हे जवळ जवळ निश्चित आहे. गेल्यावर्षी मयांकने १५६.७ किमी वेगाने चेंडू टाकला होता. आणि वेगाबरोबरच अचूकता हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.