जगभरात Instagram डाऊन! रील पाहता-पाहता Logout होत आहे अकाउंट

75
जगभरात Instagram डाऊन! रील पाहता-पाहता Logout होत आहे अकाउंट
जगभरात Instagram डाऊन! रील पाहता-पाहता Logout होत आहे अकाउंट

इंस्टाग्राम (Instagram) जगभरात डाऊन आहे. सकाळी 11.30 वाजल्यापासून समस्या आहे. Meta कंपनीच्या मालकीच्या या फोटो शेयरिंग अ‍ॅप मध्ये लॉगिन होत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. तसेच अनेकजण रील पाहत असताना अचानक लॉग आऊट झाले. downdetector.in वर युजर्सनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. तर अनेकांनी आपला राग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

अद्याप कंपनीनं याबाबत कोणतीही अधिकृत महिती दिलेली नाही. इंस्टाग्राम (Instagram) बंद पडण्यामागे कारण अद्याप समोर आलेलं नाही. सुमारे 58 टक्के वापरकर्त्यांनी डाउन डिटेक्टरला Instagram आउटेजची तक्रार नोंदवली, फीड-संबंधित समस्या, 32 टक्के ॲप-संबंधित समस्या आणि 10 टक्के सर्व्हर कनेक्शन समस्या नोंदवल्या. दिल्ली, जयपूर, लखनऊ, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि इतर ठिकाणच्या वापरकर्त्यांना ॲपच्या समस्येचा सामना करावा लागला आहे.

लोकांनी सोशल मीडियावर दिली माहिती
भारतात हे ॲप वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. याच कारणामुळे इंन्स्टाग्रामची (Instagram) सेवा काही सेकंदांसाठी बंद पडली तर सोशल मीडियावर एकच गोंधळ सुरू होतो. मात्र, आजच्या आउटेजबाबत इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावरील लोकांनी इंस्टाग्राम डाउन असल्याचा पुरावा म्हणून स्क्रीनशॉट शेअर केला आणि सांगितले की, इन्स्टा उघडताना, सॉरी, समथिंग वेंट राँग लिहिले आहे. मात्र, हे वृत्त लिहिपर्यंत डाउनडिटेक्टरवर इन्स्टाग्राम (Instagram) डाऊन झाल्याच्या बातम्यांची संख्या १०० पेक्षा कमी होती. याशिवाय जेव्हा आम्ही इन्स्टाग्राम वापरत होतो तेव्हा ते व्यवस्थित काम करत होते.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.