Fake Currency : ५०० रुपयाची खरी नोट कशी ओळखाल?

Fake Currency : एम. के. गांधींच्या जागी अभिनेता अनुपम खेरचा फोटो असलेली खोटी ५०० रुपयाची नोट व्हायरल झाली होती. 

165
Fake Currency : ५०० रुपयाची खरी नोट कशी ओळखाल?
  • ऋजुता लुकतुके

गेल्या आठवड्यातील या घटना आहेत. ४ दिवसांपूर्वीच करिमनगर इथं १.६१ लाख रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटा बाजारात फिरवणाऱ्या ५ जणांच्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं. तर दुसरी घटना याहून मोठी आहे. अहमदाबादच्या एका बुलियन व्यापाऱ्याने नवपंगपुरा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली. यात एका माणसाने त्याला दिलेल्या ५०० रुपयांच्या नोटांवर चक्क एम. के. गांधींच्या ऐवजी अभिनेता अनुपम खेर यांचा फोटो होता. व्यवहार १.३ कोटी रुपयांचा होता. त्यामुळे सगळ्या नोटा मेहुल ठक्कर या व्यापाऱ्याने तपासल्या नव्हत्या आणि तिथेच घोळ झाला.

अभिनेता अनुपम खेर यांनीही या बातमीची मजा लुटली. ‘कुछ भी हो सकता है,’ असं ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

उदाहरण म्हणून या दोन अलीकडच्या घटना दिल्या. पण, एरवीही खोट्या नोटांचा फटका आपल्याला कधी ना कधी बसलेलाच असतो. बँकांनी अशा नोटा ओळखण्यासाठी मशीन बसवल्यावर आणि पोलीसांनीही सीमेपलीकडून होणाऱ्या खोट्या नोटांचे व्यवहार धडक कारवाई करून बंद पाडल्यावर या घटना कमी झाल्या आहेत. पण, या बातम्यांच्या निमित्ताने आपणही खोट्या नोटा कशा ओळखायच्या हे समजून घेऊया. (Fake Currency)

(हेही वाचा – Assembly Election : यापूर्वीच्या मतदानाचा अनुभव लक्षात घेऊन केंद्रांवर किमान सुविधा पुरवण्यावर भर)

अनेकदा अजाणतेपणाने आपणही या बनावट नोटांमध्ये व्यवहार करत असतो. कारण, एकतर आपण वेळे अभावी नोट निरखून बघत नाही. अनेकदा बनावट नोट ओळखायची कशी हे आपल्याला माहीत नसतं. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर बनावट नोट म्हणजे काय इथपासून ते ती कशी ओळखायची याविषयीची सर्व माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे.

वेबसाईटवर ‘अर्थविषयक जागृती’ या सदरात गेलात तर ‘तुमची नोट ओळखा’, या मथळ्याखाली १० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत सर्व नोटांचे रंग, माहिती, आकार आणि सुरक्षा विषयक निकष दिलेले आहेत. रुपये १०, २० आणि ५० साठी सुरक्षाविषयक १४ निकष आहेत. त्यावरून या नोटा खऱ्या की खोट्या हे तुम्ही ओळखू शकाल. त्यानंतर रुपये १०० साठी असे १५ निकष आहेत. तर रुपये २०० आणि ५०० साठी वरच्या पंधरा निकषांबरोबरच अतिरिक्त दोन निकष आहेत. (Fake Currency)

(हेही वाचा – BMC : गळती दुरुस्तीच्या कामात कंत्राटदारांचे संगनमत; माजी विरोधी पक्ष नेत्यांनी केली चौकशीची मागणी)

बनावट नोटेसाठीचा शास्त्रीय, कायदेशीर शब्द आहे – फेक इंडियन करन्सी नोट म्हणजे एफआयसीएन.

आणि एफआयसीएन म्हणजे ‘सरकारच्या कायदेशीर मान्यतेशिवाय निर्माण केलेली चलनी नोट.’ भारतात नोटा छापण्याचा परवाना मध्यवर्ती बँक म्हणून फक्त रिझर्व्ह बँकेला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही छापलेली नोट चलनात वापरली जाऊ शकत नाही. अशी नोट छापणं किंवा ती वापरणं हे दोन्ही गुन्हे आहेत. केंद्रीय तपास संस्था अर्थात सीआयडीच्या अहवालानुसार, बनावट नोटांची रॅकेट्स दोन प्रकारे चालवली जातात. एक म्हणजे देशांतर्गत टोळ्यांमार्फत छापल्या जाणाऱ्या बनावट नोटा. दुसरं महत्त्वाचं रॅकेट हे परदेशातून दहशतवादी गटांकडून चालवलं जातं.

पहिल्या प्रकारात नोटांचे बनावट साचे बनवून नोटा छापल्या जातात. अशी रॅकेट्स पकडणं तपास यंत्रणांसाठी त्या मानाने सोपं काम आहे. बँकेतही या नोटा सहज पकडल्या जातात. पण, दुसऱ्या रॅकेट्समध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या सहभागी आहेत आणि त्यांचा हेतू देशाची अर्थव्यवस्था पोखरण्याचा आणि एक प्रकारे आर्थिक दहशतवाद माजवण्याचा आहे. या टोळ्या नोटांची नक्कलही हुबेहूब करतात. भारतात पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमधून अशा बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे अशा टोळ्या आणि त्यांनी तयार केलेल्या बनावट नोटा ओळखणं कठीण आहे. म्हणूनच नागरिक म्हणून आपणही खासकरून मोठ्या मूल्याच्या नोटा हाताळताना सावध राहण्याची गरज आहे. (Fake Currency)

(हेही वाचा – जगभरात Instagram डाऊन! रील पाहता-पाहता Logout होत आहे अकाउंट)

सध्या भारतात रुपये १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० या मूल्यांच्या नोटा चलनात आहेत. यापैकी २००० रुपयांच्या नोटांची नव्याने छपाई रिझर्व्ह बँकेनं काही वर्षांपूर्वी बंद केली आहे. दहा रुपये मूल्याची नोट बंद करून नाणी सुरू करण्याचा विचार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. आता चलनात असलेल्या सर्व नोटा या आधीच्या गांधींच्या मालिकेतीलच आहेत. म्हणजे या नोटांवर अशोकचक्राबरोबरच गांधींचा दिसेल असा फोटो आहे. सर्वच नोटांची सुरक्षा विषयक वैशिष्ट्य रिझर्व्ह बँकेनं आपल्या वेबसाईटवर दिली आहेत. पण, आपण ५०० रुपयांच्या नोटेविषयी सविस्तर जाणून घेऊ. कारण, यात सर्वाधिक १७ निकष आहेत.

रिझर्व्ह बँकेनं नव्या पाचशेच्या नोटेची माहिती देताना म्हटलंय, “पाचशे रुपये मूल्याची नवीन चलनी नोट एम. के. गांधी (नव्या) मालिकेतील नोट असून ती जुन्या (चलनातून रद्द) एसबीएन मालिकेतील पाचशेच्या नोटेपेक्षा रंग, आकार, संकल्पना, सुरक्षाविषयक वैशिष्ट्यांची जागा आणि डिझाईन यांच्या बाबतीत वेगळी आहे. तिचा आकार ६६ मिमि ╳ १५० मिमि इतका आहे आणि रंग दगडी राखाडी आहे. तसंच नोटेवर पाठच्या बाजूला ठसठशीत आकारात भारतीय वारसा सांगणारी वास्तू लाल किल्ला छापलेला आहे.” (Fake Currency)

(हेही वाचा – NMC : नाशिक मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस )

तर दोन हजारच्या नोटेची माहिती देताना रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय की, “रुपये दोन हजार मूल्याची नवी चलनी नोट ही एम. के. गांधी (नव्या) मालिकेतील नोट असून त्यावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. नोटेच्या मागच्या बाजूला मंगळायन यानाचं चित्र आहे आणि नोटेचा मुख्य रंग मजेंडा आहे. या नोटेचा आकार ६६ मिमि ╳ १६६ मिमि इतका आहे.”

ही माहितीही अनेकदा बनावट नोट ओळखण्यासाठी पुरे आहे. त्याव्यतिरिक्त सुरक्षाविषयक इतर १७ निकष कोणते आहेत ते आता पाहूया,

  • नोटेवर पुढच्या बाजूला प्रकाश आरपार जाऊ शकेल असा छोटा भाग आहे. ज्या मूल्याची नोट आहे ते मूल्य आकड्यात लिहिल्यावर तयार होणाऱ्या आकाराचा हा पारदर्शी भाग आहे. उदा. ५०० च्या नोटेमध्ये ५०० च्या आकड्याच्या आकाराचा आणि २००० च्या नोटेमध्ये आकड्यांमध्ये २००० च्या आकाराचा आहे. नोटेवर कुठलाही प्रकाश पाडून तुम्ही हे पडताळून पाहू शकाल.
  • डोळ्यासमोर ४५ अंशांच्या कोनात नोट धरलीत तर त्यावर तुम्हाला त्या नोटेचं मूल्य दिसतं. हे वैशिष्ट्य नोटेच्या पुढच्या बाजूवर आहे.
  • नोटेच्या पुढच्या बाजूवर देवनागरी भाषेत तिचं मूल्य लिहिलेलं आहे.
  • नवीन मालिकेत एम. के. गांधींच्या प्रतिमेची जागा आणि तिचा आकार बदलेला आहे. पण, सर्व नोटांमध्ये तो सारखा आहे.
  • भारतीय नोटांमध्ये ती खरी आहे हे कळावं म्हणून आणि तिचं मूल्य राखलं जावं म्हणून मध्ये चांदीचा एक धागा असतो. नोट वाकवली तर त्याचा हिरवा रंग बदलून निळा होतो.
  • नव्या मालिकेतील नोटांमध्ये गव्हर्नर यांचा संदेश, त्यांची सही आणि रिझर्व्ह बँकेचं मानचिन्ह यांची जागा उजवीकडे सरकवली आहे.
  • नोटेच्या पुढच्या भागावर एरवी मोकळ्या दिसणाऱ्या जागेवर एम. के. गांधींच्या चित्राचा वॉटरमार्क आहे. इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्कही आहे.
  • नोटेच्या उजवीकडे तळाशी नोटेचा विशिष्ट क्रमांक छापलेला आहे आणि यातील आकड्यांचा आकार वाढत जाणारा आहे.
  • नोटेच्या उजव्या बाजूला तळाशी नोटेचं लिहिलेलं मूल्य लिहिलेलं आहे. त्याचा रंग बदलणारा आहे. नोट हलवलीत तर तो हिरवा आणि निळा अशा दोन वेगळ्या रंगात दिसतो.
  • नोटेच्या अगदी उजवीकडे तळाशी अशोकचक्र आहे.
  • अशोकस्तंभाच्या बरोबर वर मधोमध दृष्टिहीन लोकांना नोट ओळखता यावी यासाठी चिन्ह आहे.
  • दृष्टिहिनांच्या मदतीसाठी नोटेच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाच छोट्या रेषा आहेत.
  • आता नोटेच्या मागच्या बाजूला डावीकडे नोटेचं छपाई वर्षं दिलेलं आहे. तर डाव्या बाजूला तळाशी स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो आणि संदेश छापलेला आहे.
  • मागच्या बाजूला मध्यभागी विविध भारतीय भाषांमध्ये नोटेचं लिखित मूल्य दिलेलं आहे.
  • प्रत्येक नोटेच्या मागच्या बाजूला वेगवेगळं भारताच्या इतिहासाशी संबंधित एखादं चित्र आहे. जसं वर सांगितल्याप्रमाणे पाचशेच्या नोटेवर लाल किल्ला आणि दोन हजारच्या नोटेवर मंगळयानाचं चित्र आहे.
  • मागच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात देवनागरी भाषेत नोटेचं मूल्य लिहिलेलं आहे. (Fake Currency)

(हेही वाचा – Supreme Court च्या कँटीनमध्ये ‘शाकाहारी विरुद्ध मांसाहारी’ वाद)

यातले १४ निकष सर्व प्रकारच्या नोटांसाठी सारखेच आहेत. तर इतर ३ निकष दोनशे आणि त्यावरील मूल्यांच्या नोटांसाठी अतिरिक्त सुरक्षा निकष म्हणून लागू करण्यात आले आहेत. भारतात बनावट नोट बरोबर ठेवणं आणि तिचा प्रसार करणं हा गुन्हा आहे. अर्थात, कायद्याने याला अपवाद आहे तो नकळतपणे अशी नोट बाळगली असेल तर. भारतीय दंडसंहितेच्या कलम ४८९ओ, ४८९बी, सी, डी व ई अंतर्गत अशा व्यक्ती आणि टोळ्या यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. होणारी शिक्षा दंड किंवा/आणि किमान दहा वर्षांचा कारावास ते आजीवन कारावासापर्यंत होऊ शकते. सरकार

त्याचबरोबर दहशतवादी गटांकडून बनावट नोटा पसरवण्याचा धोका लक्षात घेऊन आता केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचं रॅकेट चालवलं जात असेल तर त्याला अनलॉफूल अॅक्टिव्हिटीज् प्रिव्हेन्शन अॅक्ट म्हणजे युएपीए अंतर्गत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी संसदेची मंजुरी लागेल. (Fake Currency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.