Gang Rape Case : अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती; युसूफ, मोहम्मद अनस आणि मोमेन अलीला अटक

233
Gang Rape in Mumbai : सामूहिक बलात्काराचा बनाव रचणारी महिला सापडली

केरळच्या कोझिकोडमध्ये (kozhikode kerala) १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape Case ) करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून त्यांनी अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. यामुळे अल्पवयीन पीडिता ६ महिन्याची गर्भवती राहिली. पोलिसांनी अल्पवयीन पीडितेवर केलेल्या (Gang Rape Case ) अत्याचाराप्रकरणी मोहम्मद अनस(Mohammad Anas), युसूफ (Yusuf) आणि मोमन अली (Momen Ali) यांना अटक करण्यात आली आहे. हे तिन्ही आरोपी पीडितेच्या आईच्या परिचयाचे होते. याचाच फायदा घेत अल्पवयीन मुलीला आरोपींनी वासनेचे शिकार बनवले.

( हेही वाचा : Supreme Court च्या कँटीनमध्ये ‘शाकाहारी विरुद्ध मांसाहारी’ वाद

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कोझिकोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, पीडित मुलगी हायस्कुलमध्ये शिक्षण घेत होती. एकदा अचानक पीडितेच्या पोटात दुखी लागले. त्यावेळी पीडितेची तपासणी केली असता ती ६ महिन्याची गर्भवती असल्याचे कळले. आईने पीडित मुलीची चौकशी केल्यावर मोहम्मद अनस(Mohammad Anas), युसूफ(Yusuf) आणि मोमन अली (Momen Ali) याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले.

तिन्ही आरोपी अनेक दिवसांपासून पीडितेवर बलात्कार (Gang Rape Case) करत होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर पॉक्सो एॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी तिन्ही आरोपींना थामरसेरी न्यायालयात पुढील कारवाईसाठी नेले होते.

दरम्यान तिन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलिस रिमांडवर पाठवण्यात आले आहे. तसेच पीडितेची समुपदेशन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुढील उपचारासाठी तिरुवनंतपुरम येथील चाईल्ड केअरमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यात पीडितेवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये आणखी काही लोकांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केले जात आहे. सध्या पोलिस याप्रकरणाचा पोलिस तपास करत असून पुढील कारवाई करत आहेत.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.