Haryana Assembly Election : एक्झिट पोलचे अंदाज भुईसपाट; हरियाणात भाजपाची हॅटट्रिक

78
Haryana Assembly Election : एक्झिट पोलचे अंदाज भुईसपाट; हरियाणात भाजपाची हॅटट्रिक
  • वंदना बर्वे

एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवित भारतीय जनता पक्षाने हरियाणात हॅटट्रिक साधली आहे. आतापर्यंत अंदाजानुसार हरियाणात भाजपा तब्बल ५० जागांवर पुढे आहे. यामुळे देशातील शेतकरी भाजपावर नाराज असल्याच्या आरोपाचा धुव्वा उडाला आहे. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडनुसार भाजपाने हरियाणात बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपा हरियाणात विजयाची हॅटट्रिक मारणार हे जवळपास निश्चित झाले आहे. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – Nissan Magnite 2024 : निस्सान मॅग्नेटचं फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच)

हरियाणातील ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. यानंतर आलेल्या सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजात कॉंग्रेस सत्तेत येत असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात एक्झिट पोल सर्व अंदाज खोटे असल्याचे मंगळवारच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. भाजपा जवळपास ५० जागांवर आघाडीवर असून कॉंग्रेसची गाडी ३५ जागांवर अडकली आहे. हरियाणात कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी आपल्या हाती ठेवली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या डझनभर सभा सुद्धा झाल्यात. विजय संकल्प यात्रा काढली. एवढेच नव्हेत तर, हरियाणात जवान, किसान आणि पैलवान नाराज असल्याचा कुप्रचार करण्यात आला. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – Dipa Karmakar : भारताची पहिली ऑलिम्पिक जिमनॅस्ट दीपा कर्माकरची अचानक निवृत्ती)

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार भाजपाला बहुमत मिळाले आहे. ताज्या आकडेवारीत भाजपा ५० जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. अंतिम निकालानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार असली तरी सध्याच्या परिस्थितीच्या आधारे काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या कारणांवर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या खराब कामगिरीमागील मुख्य कारण म्हणजे राज्यातील पक्षाचा चेहरा माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांच्यातील मतभेद हे आहे. (Haryana Assembly Election)

हरियाणात भूपेंद्र हुड्डा आणि कुमारी सेलजा हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत 

हरियाणात कुमारी सेलजा आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांमधील मतभेदाच्या बातम्या अनेकदा चर्चेत आल्या आहेत. भूपेंद्र हुड्डा हे हरियाणातील प्रमुख जाट नेते असून गेल्या अनेक वर्षांपासून हरियाणातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भूपेंद्र हुड्डा यांचा चेहरा पुढे करण्यात आला होता. तरीसुद्धा कॉंग्रेसच्या हाती धुपाटणे आले होते. आताही त्यांचाच चेहरा पुढे करण्यात आला होता. सोबतच अन्य नेते सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. यातील प्रमुख चेहरा म्हणजे कुमारी सेलजा आणि रणदीप सुरजेवाला. कुमारी सेलजा मुख्य दलित नेत्या आहेत. याशिवाय पाच वेळेच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री सुद्धा होत्या. यांच्यातील अंतर्गत कलहामुळे कॉंग्रेसचे पानीपत झाले असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – NMC : नाशिक मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस )

निवडणुकी दरम्यान काँग्रेसमधील नेत्यांची गटबाजी उफाळून बाहेर आली होती. यामुळेच राहुल गांधी यांच्या सभेत भूपेंद्र हुड्डा आणि कुमारी सेलजा मंचावर उपस्थित असताना राहुल गांधींनी हात वर करून मतदारांना एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षातील गटबाजी पाहून माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कुमारी सेलजा यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याची ऑफरही दिली होती. काँग्रेसमध्ये दलितांचा अपमान झाला असून सेलजा यांना अपमानाला सामोरे जावे लागले आहे, असे खट्टर म्हणाले होते. आता त्या घरी बसल्या आहेत. सेलजा भाजपामध्ये दाखल झाल्यास त्यांचे स्वागत करण्यास ते तयार आहेत. गटबाजी काँग्रेसला महागात पडल्याचे आतापर्यंतच्या ट्रेंडवरून स्पष्ट झाले आहे. (Haryana Assembly Election)

जनता नाराज हे सत्य नाही – मनोज तिवारी

भाजपा खासदार मनोज तिवारी म्हणाले, ‘मी सर्वांना सांगितले होते की जमिनीवरची वस्तुस्थिती फार वेगळी आहे. टीव्ही चॅनेल्सवर किंवा दिवाणखान्यात बसून बोलणाऱ्यांच्या बोलण्याशी ग्राउंड रिॲलिटी जुळत नाही. हरियाणाची जनता भाजपावर नाराज आहे असे दाखविले जात होते. परंतु, हे सत्य नव्हते ही बाब आताच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की जे काम करतात आणि सत्याचे अनुसरण करतात त्यांनाच जनतेची सोबत मिळते’. (Haryana Assembly Election)

(हेही वाचा – देशविघातक कृत्य केले म्हणत Imtiyaz Jaleel यांनी केले बाळासाहेब ठाकरेंनाच टार्गेट)

मोहब्बत की दुकानला कुलूप

हरियाणातील लोकांनी राहुल गांधी यांच्या मोहब्बतच्या दुकानाला कुलूप लावले असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते शाहजाद पुनावाला यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ‘पवन खेडा सकाळी ८.३०-९ वाजता जिलेबी वाटत होते. ११-११.३० पर्यंत त्यांच्या (काँग्रेस) प्रवक्त्यांनी निवडणूक आयोगाला फटकारण्यास सुरुवात केली. १२ वाजेपर्यंत जयराम रमेश यांनी देशातील संस्थांवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि २ वाजेपर्यंत देशातील जनतेच्या विवेकावर प्रश्न उपस्थित करण्याचे काम केले. हरियाणा असो वा जम्मू-काश्मीर, जनतेने काँग्रेस पक्षाला स्पष्ट संदेश दिला आहे की कुस्तीपटू, सैनिक, युवक आणि शेतकरी हे सर्वच पंतप्रधान मोदींचा आदर करतात. राहुल गांधी यांचे दुकान म्हणजे द्वेषाचे दुकान आहे. म्हणूनच हरियाणातील जनतेने तथाकथित प्रेमाचे दुकान बंद पांडले आहे. हरियाणात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आपले सरकार स्थापन होत आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. (Haryana Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.