- ऋजुता लुकतुके
सध्या शेअर बाजारात इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचं सावट आहे. त्यामुळे नवीन आठवड्यात शेअर बाजार थोडे सुस्त आहेत. पण, एरवी पहिल्या सहा महिन्यात शेअर बाजाराने गुंतवणुकदारांना दिेलेला परतावा हा निघालेल्या आयपीओमधून कळतो. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या ६ महिन्यातच तब्बल ३८ कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात आणले. त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. त्यामुळे या आयपीओंनी मिळून सरासरी ४१ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. ही अधिकृत आकडेवारी सेबीनेच दिली आहे. विशेष म्हणजे लघु उद्योगाच्या आयपीओंना तब्बल ९२ टक्के परतावा मिळाला आहे. आयपीओमधून गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ३८ आयपीओपैकी ३० आयपीओतून गुंतवणूकदारांना १० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. (IPO Earnings)
(हेही वाचा – देशविघातक कृत्य केले म्हणत Imtiyaz Jaleel यांनी केले बाळासाहेब ठाकरेंनाच टार्गेट)
काही दिवसांपूर्वी बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला या आयपीओमध्ये एका शेअरची किंमत ७० रुपये निश्चित करण्यात आली होती. बजाजचा आयपीओ लिस्ट १५० रुपयांनी झाला. त्यामुळं गुंतवणूकदारांना १०० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला. बजाज हाऊसिंगच्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी तब्बल १३६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला. ३० सप्टेंबरच्या आकडेवारी नुसार यूनिकॉमर्स ई सोल्यूशन्स, प्रिमियम एनर्जीजच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ८७ टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. प्राईम डाटाबेस ग्रुपच्या रिपोर्टनुसार ३८ आयपीओमधून गुंतवणूकदारांना ४८ टक्के परतावा मिळाला आहे. ३८ आयपीओच्या आयपीओपैकी ३५ आयपीओंना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ३५ आयपीओ १० पटींहून अधिक सबस्क्राईब झाले. त्यापैकी १७ आयपीओ ५० पटींहून अधिक सबस्क्राईब झाले. (IPO Earnings)
(हेही वाचा – Haryana Assembly Election : एक्झिट पोलचे अंदाज भुईसपाट; हरियाणात भाजपाची हॅटट्रिक)
भारताच्या शेअर बाजारात आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकत्याच लिस्ट झालेल्या केआरएन हीट एक्सेंजर कंपनीच्या आयपीओला २१२ पट सबस्क्राईब करण्यात आलं होतं. या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना देखील दमदार परतावा मिळावा. सेबीनं गेल्या काही दिवसांमध्ये विविध कंपन्यांना आयपीओ लिस्टींगसाठी मंजुरी दिली आहे. ह्युंदाई या कार निर्मिती क्षेत्रातील दक्षिण कोरियातील कंपनीच्या भारतातील यूनिटचा आयपीओ लवकरच येणार आहे. ह्युंदाईचा आयपीओ तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा असेल. भारताच्या शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. यापूर्वी एलआयसीचा आयपीओ २१ हजार कोटींचा होता. ह्युंदाई कंपनीसह स्विगी, ओयो, एनटीपीसी ग्रीन या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. या कंपन्यांच्या लिस्टिंगच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. बजाज हायऊसिंग फायनान्स, पीएनजी ज्वेलर्स, प्रीमियम एनर्जीज, यूनिकॉमर्स ई सोल्यूशन्स, केआरएन हीट एक्सेंजर्सच्या आयपीओला मिळालेला दमदार प्रतिसाद पाहता गुंतवणूकदार आगामी आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करु शकतात. (IPO Earnings)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community