काँग्रेसच्या Supriya Srinet यांना आता काय म्हणायचे; नेटकऱ्यांना पडला प्रश्न

2546
काँग्रेसच्या Supriya Srinet यांना आता काय म्हणायचे; नेटकऱ्यांना पडला प्रश्न
काँग्रेसच्या Supriya Srinet यांना आता काय म्हणायचे; नेटकऱ्यांना पडला प्रश्न

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारून ५७ वर्षांनी तिसऱ्यांदा निवडून येण्याची हॅटट्रिक केली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालांनुसार भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेसचा पराभव स्पष्ट आहे. दरम्यान, काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet) यांचे काही दिवसांपूर्वीचे एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आले असून त्यावरून त्यांना ट्रोल केले जात आहे. (Haryana Assembly Election 2024)

९० सदस्यांच्या विधानसभेसाठी हरियाणात बहुमतासाठी ४६ चा आकडा पार करणे आवश्यक आहे. भाजपाने आतापर्यंत ५० जागांवर आघाडी घेतली आहे. याच कालावधीत काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये माध्यमांसमोर बोलतांना श्रीनेत म्हणाल्या होत्या, “भाजपाने २० पेक्षा जागा जिंकल्या, तर मी माझे नाव बदलेन. भाजपाने २० पेक्षा जास्त जागा जिंकल्या, तर मी माझे नाव बदलेन. १५ ते २० जागाच भाजपा जिंकेल. कदाचित याच्यापेक्षाही कमी पण जास्त नाही.”

सध्या हाती येत असलेल्या निकालांवरून हरियाणात भाजपाचं कमळ फुलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सुप्रिया श्रीनेत यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. ‘सुप्रिया श्रीनेत (Supriya Srinet) यांना आता जलेबी बाई म्हणून हाक मारा’, असे काही जण म्हणाले आहेत तर, काही जणांनी ‘गाली वाली दिदी’ म्हणून हाक मारायला सुरुवात करायची, असे का विचारले आहे. काहींनी सुप्रिया श्रीनेत यांच्यासाठी नाव सुचवा, अशीही पोस्ट केली आहे.  (Haryana Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.