बनावट लसीकरणातील ‘मोठा मासा’ शोधून काढा! उच्च न्यायालयाचा आदेश

तपास अधिकाऱ्यांना योग्य तपास करण्यास सांगाच आणि कुणालाही दयामया दाखवू नका, असे न्यायालयाने सरकारी वकील ठाकरे यांना सांगितले.

156

मुंबईत ठिकठिकाणी बनावट लसीकरण मोहिमा राबवण्यात आल्या, त्याचा मुंबई पोलिस तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी याचा तपास करताना यामागील ‘मोठा मासा’ कोण आहे, त्याचा शोध घ्यावा, त्याला सोडू नका, असे मुंबई उच्च न्यायालयाने ठणकावून सांगितले.

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर दाखल याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले. लसीकरणासंबंधी अनेक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा : …म्हणून स्वबळाची भाषा करणारे नाना आले ‘बॅकफूटवर’)

कुणालाही दयामया दाखवू नका!  

बनावट लसीकरणाच्या घोटाळ्यात कुणालाही सोडता कामा नये, असे तपास अधिकाऱ्यांना सांगा. यातील ‘मोठा मासा’ अजून हाताला लागायचा आहे. त्याचा शोध घ्या, त्याला सोडू नका. तपास अधिकाऱ्यांना योग्य तपास करण्यास सांगाच आणि कुणालाही दयामया दाखवू नका, असेही सांगा, असेही न्यायालयाने सरकारी वकील ठाकरे यांना सांगितले. महापालिकेने या बनावट लसीकरणातील जे पीडित आहेत, त्यांची चाचणी करून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले.

बुधवारपर्यंत खासगी लसीकरण मोहिमांची नियमावली! – महापालिका  

राज्य सरकारचे वकील दीपक ठाकरे यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले कि, मुंबईत बनावट लसीकरणप्रकरणी एकूण ७ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तर महापालिकेचे वकील अनिल साखरे म्हणाले कि, गृहसंकुलांमध्ये आणि खासगी कार्यालायांमध्ये लसीकरण मोहिमा राबवण्यासंबंधी नियमावली तयार करण्यात येणार आहे. बुधवारीपर्यंत ही नियमावली अंतिम होणार आहे, असे सांगितले.

(हेही वाचा : स्थायी समितीने दिलेल्या अधिकाराचा प्रशासनाकडून आजही वापर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.