Maharashtra Bhavan : अयोध्येत महाराष्ट्र भवन, मंत्री रवींद्र चव्हाणांसह मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

134
Maharashtra Bhavan : अयोध्येत महाराष्ट्र भवन, मंत्री रवींद्र चव्हाणांसह मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
Maharashtra Bhavan : अयोध्येत महाराष्ट्र भवन, मंत्री रवींद्र चव्हाणांसह मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

देशातील राम भक्तांसाठी श्रीराम जन्मभूमीचं (Shri Ram Janmbhoomi) महत्त्व खूप आहे. जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्या नगरीत विराजमान झाले तो दिवस देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा झाला होता. अशातच आता अयोध्येच रामभक्तांच्या निवासासाठी महाराष्ट्र भवनाची (Maharashtra Bhavan)उभारणी करण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या होणाऱ्या वास्तूसाठीचे (Maharashtra Bhavan)भूमिपूजन दि. ८ ऑक्टोबर रोजी केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण(Ravindra Chavan), यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले.त्यावेळी राज्य शासनाच्या सचिव मनीषा म्हैसकर, यूपीचे आमदार आदी मान्यवर उपस्थिती होते.

( हेही वाचा : Irani Cup 2024 : इराणी चषक विजेत्या मुंबईला १ कोटी रुपयांचं बक्षीस

दरम्यान बालकराम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह मान्यवरांनी केली.भूमिपूजन झाल्याने आता भवनाच्या (Maharashtra Bhavan) कामाला लवकरच सुरुवात केली जाईल. महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल आहे अशी प्रतिक्रिया अयोध्या परिसरातील मराठी बांधवांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी बांधवांची गैरसोय अयोध्या नगरीत (Shri Ram Janmbhoomi)होणार नाही हे निश्चित.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.