Dhangar Reservation साठी मंत्रालयात आंदोलन

121
Dhangar Reservation साठी मंत्रालयात आंदोलन
  • प्रतिनिधी

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (०८ ऑक्टोबर) मंत्रालयात घुसून आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात सुरक्षेसाठी बांधलेल्या जाळीवर उड्या मारून आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी जाळीवर उतरून आंदोलकांना बाहेर काढले. यावेळी आंदोलकांनी धनगर आरक्षणाचा शासन आदेश काढण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. (Dhangar Reservation)

(हेही वाचा – Thane News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक)

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. विधानसभा निवडणूक घोषित झाल्यास धनगर आरक्षणाचा निर्णय मागे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीचे निमित्त साधून आंदोलन छेडण्याचे ठरवले होते. मंत्रिमंडळ बैठक ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे होणार असल्याने कार्यकर्ते सुरुवातीला ‘सह्याद्री’वर जाणार होते. मात्र, आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चाचे मंत्रालयात वळविला. (Dhangar Reservation)

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या ‘दलित किचन’ व्हिडिओला जातिभेदाची किनार! नेटकऱ्यांनी केले ट्रोल !!)

मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सकल धनगर समाजाचे १५ कार्यकर्ते मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर पोहचले. तेथून तीन कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून घोषणाबाजी सुरु केली. तर उर्वरित कार्यकर्त्यांनी तिसऱ्या मजल्यावर घोषणा द्यायला सुरुवात केली. अनपेक्षितपणे झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी सुरक्षा जाळीकडे धाव घेत कार्यकर्त्यांनी पकडून बाहेर काढले. यावेळी कार्यकर्त्यांनी धनगर आरक्षणाचा शासन निर्णय त्वरित काढा, अशी मागणी केली. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले. (Dhangar Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.