जमिनीवरील परिस्थिती लोकांसमोर आली आहे; Praful Patel यांचा विरोधकांवर हल्लाबोल

69
जमिनीवरील परिस्थिती लोकांसमोर आली आहे; Praful Patel यांचा विरोधकांवर हल्लाबोल
  • प्रतिनिधी

इंडी आघाडीने माध्यमातून हरियाणामध्ये कॉंग्रेस येणार अशी अफवा पसरवली होती. तसेच जम्मू-कश्मीरमध्येही भाजपाचा दारुण पराभव होणार असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले. परंतु जमिनीवरील परिस्थिती काय होती ती आज लोकांसमोर आली असून हरियाणामध्ये जिलेबी खायची कुणावर वेळ आली आहे हे सिद्ध झाले अशा शब्दांत थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मंगळवारी (०८ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर केला.

काश्मीर खोऱ्यातील विचार करता तिथे नॅशनल कॉन्फरन्स पार्टी अनेक वर्षे काम करत आहे. तिथे भाजपा व इतर पक्षांचे कमी अस्तित्व आहे आणि दुसर्‍या बाजूला जम्मूमध्ये भाजपा एक नंबरवर आहे. त्यातही कॉंग्रेसला ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या जीवावर मिळाल्या असून स्वतः च्या जीवावर जागा मिळवता आलेल्या नाहीत. मात्र हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार आले आहे. अनेक घटक नाराज आहेत हा जो प्रचार इंडी आघाडीने केला होता हे फक्त माध्यमांना हाताशी धरून लोकांची दिशाभूल करत होते हे सिद्ध झाले आहे असाही सणसणीत टोला पटेल (Praful Patel) यांनी विरोधकांना लगावला.

(हेही वाचा – हरियाणा निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती; DCM Devendra Fadnavis यांचा विश्वास)

मागील दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने देशात आणि राज्यात प्रगती करण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यात शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना अशा अनेक क्रांतीकारी योजनांमध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपये आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. हे कुणाला नाकारता येणार नाही असेही खा. पटेल (Praful Patel) यांनी यावेळी ठामपणे बोलताना नमूद केले. महायुतीतील जागावाटप संदर्भात विचारले असता खा. पटेल म्हणाले की, महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे. विधानसभेसाठी जवळपास २३५ जागांवर आमचे एकमत झालेले असून उरलेल्या ज्या जागा आहेत त्यावर एक-दोन दिवसात बसून योग्य मार्ग काढणार आहोत.

महायुतीमध्ये मतभेद आहेत असे विरोधकांकडून उभे करण्यात येत असलेले चित्र हे अतिशय चुकीचेच असून आऊटगोईंग आणि इनकमिंगचा जो विषय आहे, त्यामध्ये काही माणसे इकडे तिकडे गेल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होत नाही. आणि प्रत्येक निवडणुकीत काही लोकं इकडेतिकडे म्हणजे या पक्षातून त्या पक्षात जात असतात. त्याचा अर्थ जनसामान्यांच्या मनात नाराजी आहे असा नाही. स्थानिक स्तरावर काही गणितं बिघडवण्यासाठीच ते इकडे तिकडे जात असतात. पण आज हरियाणाचा निकाल आल्यानंतर आऊटगोईंग आणि इनकमिंग करणारे विचार करतील असा मार्मिक इशाराही खा. पटेल (Praful Patel) यांनी पक्षांतर करणाऱ्यांना दिला.

(हेही वाचा – Congress चे आरोप तथ्यहीन, बेजबाबदार; निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण)

हरयाणातील भाजपाचा आजचा विजय हा ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, असा थेट सवाल केला असता, खा. पटेल (Praful Patel) म्हणाले की, लोकसभेच्या वेळी ईव्हीएम चांगली होती. पंतप्रधान मोदींचे मताधिक्य कमी झाले त्यावेळी ईव्हीएम चांगली होती आणि आता ईव्हीएम यांना खराब आहे असे दिसू लागले आहे. मग काश्मीरमध्येही ईव्हीएम मध्ये बिघाड होऊ शकला असता ना? परंतु असे काही नाही झाले. कधी कधी आपल्याला ही व्यवस्था बरोबर आहे असा विश्वास ठेवायला पाहिजे. मात्र जेव्हा विरोधक पराभूत होतात तेव्हा ‘अंगूर खट्टे है’ ही म्हण त्यांना लागू होते असा टोलाही खा. पटेल यांनी लगावला.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती पुन्हा सत्तेत येईल असे वाटते का? अशी विचारणा केली असता, खरं तर आपल्या भल्यासाठी कोण काम करत आहे हे लोकांना आता समजले आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मागील एक वर्षात महायुतीने क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे नक्कीच प्रत्येक वर्गाला हे आमचं सरकार परत आले पाहिजे असे वाटत आहे असा ठाम विश्वासही खा. पटेल (Praful Patel) यांनी व्यक्त केला. त्याचवेळी अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत अशी अधिकृत घोषणाही खा. पटेल यांनी यावेळी बोलताना केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.