International Postal Day का साजरा केला जातो?

63
International Postal Day का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय टपाल दिवस (International Postal Day) हा दिवस दरवर्षी ९ ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. १८७४ सालापासून स्वित्झर्लंड येथे या दिवसाची सुरुवात करण्यात आली. स्वित्झर्लंड येथे असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU च्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU ही जागतिक संप्रेषण क्रांतीची सुरुवात होती. त्यामुळे जगभरातील लोकांना पत्र लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळालं.

जागतिक टपाल दिवस (International Postal Day) हा १९६९ सालापासून साजरा केला जाऊ लागला. तेव्हापासूनच जगभरातले अनेक देश टपाल सेवेचे महत्त्व समाजामध्ये अधोरेखित करण्यासाठी या उत्सवामध्ये भाग घेतात. जागतिक टपाल दिवस हा वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. काही देशांतल्या पोस्ट ऑफिसमध्ये विशेष मुद्रांकांची संग्रह प्रदर्शनं आयोजित केली जातात. याव्यतिरिक्त पोस्टचा इतिहास जाणून घेण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.

(हेही वाचा – Congress चे आरोप तथ्यहीन, बेजबाबदार; निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण)

युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU कडून तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा आयोजित केली जाते. युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU तर्फे ९ ऑक्टोबर या दिवशी सर्वोत्तम टपाल सेवा बहाल केली जाते. पत्र प्रणाली अनेक शतकांपासून कार्यरत आहे. इतिहासात लोकांनी एकमेकांना पत्रे पाठवल्याचे पुरावे आहेत. त्या वेळी विशेष संदेशवाहकांद्वारे पायी किंवा घोड्यावरुन पत्रे पाठवली जात असत. सर्वप्रथम १६०० सालच्या दशकापासून राष्ट्रीय टपाल प्रणाली अनेक देशांमध्ये उदयास येऊ लागली. ही प्रणाली संघटित होती. बरेच लोक तिचा वापर करू शकत होते.

त्यानंतर हळूहळू देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मालाची देवाणघेवाण करण्याची सुरुवात केली. १८०० सालच्या उत्तरार्धात जागतिक टपाल सेवा होती. पण ती मंद स्वरूपाची आणि गुंतागुंतीची होती. १८७४ साली युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU ची सुरुवात झाल्यामुळे आज अस्तित्वात असलेल्या सर्वोत्कृष्ट कार्यक्षम टपाल सेवेचा मार्ग खुला झाला आहे. १८४८ साली युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU ही संयुक्त राष्ट्रांची एजन्सी बनली. (International Postal Day)

(हेही वाचा – Shiv Sena : बाळासाहेबांचा विश्वासू सेवेकरी राहिलेल्या व्यक्तीवर शिवसेनेने सोपवली ‘ही’ जबाबदारी)

९ ऑक्टोबर हा जपानमधल्या टोकियो येथे १९६९ सालच्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU च्या कार्यक्रमात प्रथम जागतिक पोस्ट दिवस म्हणून घोषित करण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य श्री. आनंद मोहन नरुला यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. तेव्हापासूनच टपाल सेवांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जगभरात जागतिक टपाल दिवस साजरा केला जातो. (International Postal Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.