- खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करीत योजनेसाठी कर्ज काढावे लागणार असल्याची एका न्यूज चॅनलची बातमीही ‘X’ या समाज माध्यमावर पोस्ट केली. त्यावर ‘नेटकरी बहीण-भावांनी’ आव्हाड यांना चांगलेच सुनावले.
दिशाभूल करणारी पोस्ट
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या दिशाभूल करणाऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राज्य भिकेला लागले तरी चालेल. कर्मचारी, अधिकारी, पेन्शनर यांना त्यांचा हक्काचे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन नाही मिळाले तरी चालेल. पण निवडून येण्यासाठी फसव्या योजना चालू राहिल्या पाहिजेत. आता लवकरच लाडकी बहीण योजना बंद नाही केली तरी जिल्ह्यांना अनुदानाची रक्कम बंद केली जाईल.”
😡 राज्य भिकेला लागले तरी चालेल. कर्मचारी, अधिकारी, पेन्शनर यांना त्यांचा हक्काचे वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन नाही मिळाले तरी चालेल. पण निवडून येण्यासाठी फसव्या योजना चालू राहिल्या पाहिजेत. आता लवकरच लाडकी बहीण योजना बंद नाही केली तरी जिल्ह्य़ांना अनुदानाची रक्कम बंद केली जाईल. pic.twitter.com/XlvHYjKhD5
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 6, 2024
(हेही वाचा – Congress चे आरोप तथ्यहीन, बेजबाबदार; निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण)
अप्रत्यक्ष योजनेवर टीका-टिप्पणी
महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’ ही महत्वाकांक्षी योजना असून या योजनेवर राज्यातील सरकारची भिस्त आहे, असे मानले जाते. त्यामुळे विरोधी पक्षांकडून थेट योजना बंद करण्याची मागणी न करता अप्रत्यक्ष योजनेवर टीका-टिप्पणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आव्हाड यांनी योजनेवर थेट टीका न करता राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्याचे सुचवले आहे.
तुम्ही काय आमदार होणार नाही
एकाने “लाडकी बहिणवरुन एवढा गदारोळ करायची गरज नाही, हयापेक्षा जास्त भ्रष्टाचार तर सरकारमधील मंत्री (कोणच ही असो) आणि सरकारी बाबू किती वेतन घेत आहे आणि काम किती आणि कसे करतात, हे जगजाहीर आहे. राज्य त्याने भिकेला लागले,” असे आव्हाड यांच्या डोळ्यात अंजन टाकले. तर एका नेटकऱ्याने, “आव्हाड, तुम्ही तुमचे सरकार असताना काही योजना आणल्या नाही, दुसरे करतायत, तर करू देत नाही. किती खराब मानसिकता तुमची.. तुम्ही काय आमदार होणार नाही ह्या वेळेस..” असे भाकीत वर्तवले. (Jitendra Awhad)
(हेही वाचा – Shiv Sena : बाळासाहेबांचा विश्वासू सेवेकरी राहिलेल्या व्यक्तीवर शिवसेनेने सोपवली ‘ही’ जबाबदारी)
महाराष्ट्र GDP मध्ये अव्वल
“अश्याच छान योजना ‘इंडी आघाडी’चे शासन असलेल्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, तामिळनाडूमध्ये चालू आहेत त्या आधी बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, नंतर तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अणि त्यांचा कुटुंबीयांच्या तोंडाचा घास पळवण्यात यावा,” असा टोला एकाने हाणला. तर “सगळ्या आजी माजी आमदार, खासदार यांचे मानधन सरकारने थांबवून लाडकी बहीण योजना सुरू ठेवावी. तसेही राजकारणात येण्याअगोदर प्रत्येक आमदार/खासदार जनतेची सेवा करण्याकरिताच आलेले आहेत आणि त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या मानधनाची गरजही नाहीय,” असे सांगून लोकप्रतिनिधींना एकप्रकारचा इशारा दिला. “सदरील योजना मध्य प्रदेशमधे खूप वर्षांपासून चालू आहे. तसे बघितले तर मध्य प्रदेशचे उत्पन्न (GDP) हा महाराष्ट्रापेक्षा खूप कमी आहे. महाराष्ट्र सगळ्यात टॉपला आहे GDP मध्ये. मग बाकीचे राज्य योजना राबवू शकतात तर आपण का नाही? It’s a part of welfare state,” असे एकाने स्पष्ट केले. (Jitendra Awhad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community