Hindustan Unilever Limited : हिंदुस्थान युनिलिव्हर – तगड्या स्पर्धेतही टिकून राहिलेला ब्रिटिशकालीन ब्रँड

Hindustan Unilever Limited : लाईफबॉय, पिअर्स ते पाँड्स अशी कंपनीची उत्पादनं आहेत 

41
Hindustan Unilever Limited : हिंदुस्थान युनिलिव्हर - तगड्या स्पर्धेतही टिकून राहिलेला ब्रिटिशकालीन ब्रँड
Hindustan Unilever Limited : हिंदुस्थान युनिलिव्हर - तगड्या स्पर्धेतही टिकून राहिलेला ब्रिटिशकालीन ब्रँड
  • ऋजुता लुकतुके 

ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये जुनं नाव असलेलं आणि काळानुरुप आपल्या उत्पादनांमध्ये बदल करून आताच्या काळातही आपलं नाव टिकवून असलेली एक कंपनी म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर. लाईफबॉय हा एकेकाळचा साबणातला एकमेव ब्रँड भारतात होता. पण, तो जमाना ब्रिटिश सत्तेचा होता. आणि बाकी स्पर्धा नव्हतीच. त्यामुळे हिंदुस्तान युनिलिव्हर ही एकमेव बहुराष्ट्रीय कंपनी होती. आणि लाईफबॉय हा घराघरातील ब्रँड होता. पण, आता स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे लाईफबॉयने सुरू झालेला हिंदुस्तान युनिलिव्हरचा प्रवासही आता पिअर्स आणि पाँड्सवर पोहोचला आहे. (Hindustan Unilever Limited)

(हेही वाचा- Election Commission: काँग्रेसचे ‘ते’ आरोप तथ्यहिन, बेजबाबदार! निवडणूक आयोगाने फटकारलं)

हेच ब्रिटिशकालीन या कंपनीचं वैशिष्ट्य आहे. कालानुरुप उत्पादनांमध्ये केलेलं बदल, आधुनिक वितरण व विपणन आणि स्पर्धेला पुरून उरेल अशी जाहिरात मोहीम. (Hindustan Unilever Limited)

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीत आघाडीवर असलेली देशातील कंपनी आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. या कंपनीची मालकी नेमकी कुणाकडे आहे तुम्हाला ठाऊक आहे का? अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात १८८९ च्या दशकात कंपनीने आपलं पहिलं उत्पादन भारतात आणलं होतं. ‘लाईफबॉय’ हा साबण आणि त्याची जाहिरात त्या काळात चांगलीच गाजली होती. तिथपासून ते भारतातील हिंदुस्तान वनस्पती लिमिटेड या कंपनीशी लिव्हर कंपनीचा झालेला भागिदारी करार असा मोठा इतिहास या कंपनीला लाभला आहे. (Hindustan Unilever Limited)

(हेही वाचा- ठरलं तर! मंगळावर ५०० दिवस राहणार मानव, ‘NASA’ने सांगितली तारीख)

लिव्हर ब्रदर्स इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान वनस्पती मॅनुफॅक्चरिंग लिमिटेड या दोन कंपन्यांच्या संगमाने हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी स्थापन झाली आहे. १९५६ मध्ये ही कंपनी भारतात अस्तित्वात आली. आणि त्याची मालकी प्रामुख्याने इंग्लंडमधील लिव्हर बंधूंकडेच आहे. कंपनीचं मुख्यालय मात्र मुंबईत आहे. आणि भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे. (Hindustan Unilever Limited)

कंपनीचं संचालक मंडळ मोठं असून त्यावर सध्या १७ संचालक आहेत. आणि कंपनीचे २१,००० कर्मचारी देशभर काम करतात. हिंदुस्तान युनिलिव्हरची उत्पादनं १९० देशांमध्ये जातात. तर कंपनीचं शेअर बाजारातील भागभांडवल जवळ जवळ ६ ट्रिलियन रुपये इतकं आहे. कंपनीची महत्त्वाची उत्पादनं आणि ती कधी सुरू झाली ते पाहूया, (Hindustan Unilever Limited)

(हेही वाचा- Railway track: रेल्वेमार्गावरील घातपाताचे कारस्थान रोखण्यासाठी ‘ट्रॅक मित्र’ अभियान सुरू; RPF आणि GRP चा नवीन उपक्रम)

लाईफबॉय साबण, पिअर्स साबण, ब्रूक बाँड हा चहाचा ब्रँड, व्हिम हा कपड्यांचा साबण, वनस्पती तूपाचा ब्रँड, पाँड्सची उत्पादनं, सर्फ साबण, रिन बार, ब्रू कॉफी, लिरिल साबण, क्लोज – अप टूथपेस्ट, फेअर अँड लव्हली, लिप्टन ताझा चहा, लॅक्मेची सर्व उत्पादनं, क्वालिटी वॉल्श आईस-क्रीम, वीवॉश ही कंपनीची प्रमुख उत्पादनं आहेत. २०२३ पासून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालन रोहीत जावा आहेत. (Hindustan Unilever Limited)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.