-
ऋजुता लुकतुके
जगभरात मर्सिडिझची सगळ्यात लोकप्रिय लक्झरी कार असलेली ई क्लास २०२४ ही गाडी आता नवीन अवतारात भारतात लाँच झाली आहे. आणि विशेष म्हणजे भारतातही ती एकाच वेळी लाँच झाली आहे. बीएमडब्ल्यू ५ सीरिज आणि मर्सिडिझ बेंझ ई क्लास या गाड्या एका मागोमाग येत असल्यामुळे लक्झरी कार सेगमेंटमध्ये एक वेगळीच हलचल बघायला मिळणार आहे. ई क्लासच्या सहाव्या पिढीतील नवीन कारमध्ये अनेक आकर्षक बदल करण्यात आले आहेत. (Mercedes-Benz E-Class 2024)
(हेही वाचा- Election Commission: काँग्रेसचे ‘ते’ आरोप तथ्यहिन, बेजबाबदार! निवडणूक आयोगाने फटकारलं)
सगळ्यात पहिला बदल म्हणजे आधीच्या तुलनेत ही कार प्रशस्त आणि मोठी आहे. तिची लांबीच मूळी ५.०६ मीटर इतकी आहे. गाडीचं ग्रिल, हेडलँप आणि बंपर हे सगळं आधुनिक आणि ईक्यू गाडीसारखं असेल. गाडीची मागची बाजू बघितली तर तुम्हाला एस क्लासची गाडी बघितल्याचा भास होईल. गाडीच्या आतल्या भागातील बदल तर आधुनिकतेचा कळस म्हणावे असे आहेत. इथे पुन्हा एकदा ईक्यू गाडीचा आधार घेण्यात आला आहे. (Mercedes-Benz E-Class 2024)
2024 Mercedes-Benz E-Class Review, Pricing, and Specs https://t.co/8qzBQsxtH7
— Vanalich (@vanalich) October 6, 2024
चालक आणि सह प्रवाशाच्या समोर एक अख्खा डिजिटल डिस्प्ले आहे. याचे जरी तीन भाग असले तरी ते एकसंध असल्यामुळे तुमच्यासमोर एक अख्खं ग्लास पॅनल दिसतं. आणि ते भव्य आहे. यातील इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन हा १७.५ इंचांचा आहे. आतील एलईडी लाईट्समुळे एक आकर्षक प्रकाश आतमध्ये पसरतो. शिवाय गाडीतील सर्व सीट या इलेक्ट्रिक यंत्रणेने मागे – पुढे सरकवता येतात. चालकाच्या सुरक्षेसाठी एसलेली एडीएएस प्रणाली ही पूर्णपणे आधुनिक आणि इतर लक्झरी कारमध्ये सध्याची सर्वोत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (Mercedes-Benz E-Class 2024)
(हेही वाचा- Mumbai Water Supply : मुंबईमधील ‘वडाळा,शीव आदी भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा)
गाडीचं इंजिन मात्र जुनंच म्हणजे २.० पेट्रोल व डिझेलवर आधारित आहे. त्याशिवाय ३.० डिझेल व्ही६ इंजिनाचा पर्यायही कंपनीने दिला आहे. अशी ही मर्सिडिझची लक्झरी काल भारतात ९८ लाख ते १.१५ कोटी रुपयांना मिळू शकेल. तिची थेट स्पर्धा बीएमडब्ल्यू ५ सीरिज या नुकत्याच लाँच झालेल्या कारशी असेल. (Mercedes-Benz E-Class 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community