Dipa Karmakar : दीपा कर्माकरच्या कारकीर्दीतील ५ महत्त्वाच्या घटना 

Dipa Karmakar : ३१ वर्षीय दीपा कर्माकरने जिमनॅस्टिक्समधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला

120
Dipa Karmakar : दीपा कर्माकरच्या कारकीर्दीतील ५ महत्त्वाच्या घटना 
Dipa Karmakar : दीपा कर्माकरच्या कारकीर्दीतील ५ महत्त्वाच्या घटना 
  • ऋजुता लुकतुके 

भारताची ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेली पहिली महिला खेळाडू ही दीपा कर्माकरची एकमेव ओळख नाही. प्रुदोनोवा हा खेळातील एक अत्यंत कठीण प्रकार साध्य केलेली ती जागतिक स्तरावरील फक्त ५ जिमनॅस्टपैकी एक जिमनॅस्ट आहे. आणि त्यासाठी तिने जिमनॅस्टिक्स खेळात स्वत:चे स्थान निर्माण केलं आहे. मागच्या वर्षभरात झालेल्या दुखापतींनंतर तिने सोमवारी अचानक निवृत्ती जाहीर केली. शरीर आता साथ देत नसल्यामुळे इथंच थांबणं योग्य ठरेल असं तिचं म्हणणं होतं. त्या निमित्ताने दीपा कर्माकरच्या कारकीर्दीतील ५ महत्त्वाच्या क्षणांना उजाळा देऊया. (Dipa Karmakar)

वयाच्या सहाव्या वर्षी तिने जिमनॅस्टिक्सला सुरुवात केली होती. तेव्हापासून २५ वर्षं ती अव्याहत खेळाचा सराव करत होती. त्रिपुरा राज्यातील आगरताला या राजधानीच्या ठिकाणी तरी छोट्याशा गावात दीपाने जिमनॅस्टिक्सला सुरुवात केली. बसवेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने जागतिक स्तरावर बाजी मारली. (Dipa Karmakar)

(हेही वाचा- Mumbai Water Supply : मुंबईमधील ‘वडाळा,शीव आदी भागात अपुरा आणि दूषित पाण्याचा पुरवठा)

दीपाची जगाने पहिल्यांदा दखल घेतली ती २०१४ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत वॉल्ट या कठीण प्रकारात तिने कांस्य पदक पटकावलं होतं. तेव्हा भारतात तिची पहिल्यांदा दखल घेतली गेली. कारण, राष्ट्रकूल स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली जिमनॅस्ट होती.  (Dipa Karmakar)

आता कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर २०२४ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत दीपाने आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्समध्ये सुवर्ण जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे तिचं शेवटचं पदक ठरलं.  (Dipa Karmakar)

 जागतिक जिमनॅस्टिक्समध्ये प्रुदोनोवा व्हॉल्ट हा सगळ्यात कठीण प्रकार मानला जातो. त्याच लवचिकता, चपळाई, चापल्य अशा सगळ्याचाच कस लागतो. जागतिक स्तरावर फक्त ५ जिमनॅस्टनी ही कसरत पूर्ण केली आहे. त्यातील एक आहे दीपा कर्माकर. (Dipa Karmakar)

(हेही वाचा- Election Commission: काँग्रेसचे ‘ते’ आरोप तथ्यहिन, बेजबाबदार! निवडणूक आयोगाने फटकारलं)

२०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय जिमनॅस्ट ठरली होती. ऑलिम्पिकमध्येही तिची कामगिरी सरस ठरली. व्हॉल्ट प्रकारात ती चौथी आली. तिचं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं. त्या कामगिरीनंतर तिला केंद्रसरकारकडून पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला. तसंच २०१६ मध्ये तिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Dipa Karmakar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.