जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या (Indian Army) दोन जवानांचे अपहरण केले. दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून जाण्यात एक जवान यशस्वी झाला. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिस जवानाच्या शोधासाठी शोध मोहीम राबवत आहेत. अनंतनागच्या कोकरनाग भागातील शांगस येथून टेरिटोरियल आर्मीच्या जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.
(हेही वाचा-Amit Shah: “परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना धडा मिळाला”, अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा)
माहितीनुसार, अनंतनागमधील वनक्षेत्रातून दोन टेरिटोरिअल आर्मीच्या सैनिकांचे कथितरित्या अपहरण करण्यात आले होते. या दोघांपैकी एक जवान पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याच्याकडून तपशीलवार माहिती गोळा केली जात आहे. (Indian Army)
(हेही वाचा-Congress मध्ये छुप्या बैठकांचे सत्र, पक्षनेतृत्त्वासमोरील टेन्शन वाढले)
सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती आहे. “जम्मू-काश्मीरमधील अनंतनागच्या जंगल परिसरात प्रादेशिक लष्कराच्या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. मात्र, एक जवान परत येण्यात यशस्वी झाला आहे. बेपत्ता जवानाच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम सुरू केली आहे,” अशी माहिती एएनआयने दिली आहे. (Indian Army)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community